प्रचंड आकर्षक आणि वृत्तमूल्य असलेला पण सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक असलेल्या राजकीय-सामाजिक मजकुराला यापुढे धोकादायक म्हणून आधोरेखित केलं जाईल, असं फेसबुकनं स्पष्ट केलं आहे. जवळपास 90 हून अधिक कंपन्यांनी फेसबुकवर जाहिराती देण्यास नकार दिल्यानंतर कंपनीनं अधिक सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवरील मजकूर मर्यादा ओलांडणारा किंवा भडक नसावा यासाठी समाजातून कंपनीवर मोठा दबाव आहे. विशेष म्हणजे यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांच्या फेसबुक पोस्टवरही गंभीर आक्षेप आहेत.


सध्या अमेरिकेत राजकीय ध्रुवीकरणाचा काळ असल्याचं म्हणत युनिलिव्हरनंही फेसबुकवरील जाहिराती बंद केल्यात. तर डव्ह साबण आणि जेरीस आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीनं 2020 या पूर्ण वर्षात फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर जाहिरात देणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सध्याच्या काळात फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या कंपन्यांना जाहिराती देणं लोकांच्या आयुष्यात आणि समाजासाठी हितकारक नसल्याचं कंपनीनं म्हटलंय. जर गरज पडली तर आम्ही या निर्णयाचा पुनर्विचार करु असंही त्यांनी सुचवलंय. दरम्यान शुक्रवारी आपल्या भाषणात फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी हेट स्पीचविरोधात कंपनीनं वेळोवेळी पावलं उचलल्याचं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी युरोपियन कमिशनच्या रिपोर्टचा हवाला दिलाय. ज्यात गेल्या वर्षी फेसबुकनं 86 टक्के हेट स्पीच आपल्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकल्याचं म्हटलंय.


डॉनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन फेसबुक, ट्विटर आमने-सामने


जॉर्ज फ्लॉईडचा पोलीसी अत्याचारामुळे मृत्यू झाल्यानंतर वर्णद्वेषाविरोधात अमेरिकेत मोठी चळवळ उभी राहिली आहे. तसंच द्वेषपूर्ण तिरस्करणीय मजकूर फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला जात असल्याबद्दलही नाराजी आहे. दरम्यान फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटरनं गेल्या वर्षी जाहिरातीमधून तब्बल 70 बिलियन डॉलरचा महसूल गोळा केलाय.


फेसबुक विरुद्ध ट्विटर
माझ्या मते फेसबुक किंवा कोणत्याही इंटरनेट प्लॅटफॉर्मने फॅक्ट चेक करण्या संदर्भात मध्यस्थाची भूमिक घ्यायला हवी. फॅक्ट चेक करणे ही अवघड गोष्ट आहे. लोकशाहित राजकीय भाषण ही संवेदनशील गोष्ट आहे. ती लोकांपर्यंत पोहचायला हवी की त्यांचा राजकीय नेत्याचे मत काय आहे, अशी भूमिका फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने मांडली आहे. मार्कने घेतलेली ही भूमिका डॉनाल्ड ट्रम्प यांच्या जवळ जाणारी आहे. ट्विटरचा निर्णय हा फ्रिडम ऑफ स्पीचच्या विरोधात असल्याचे त्याने म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात ट्विटर आणि फेसबुक विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे.


Coronavirus Update | देशात कोरोना रुग्णसंख्येनं पाच लाखाचा टप्पा ओलांडला