मुंबई: मोटोरोलानं मंगळवारी आपल्या मोटो जी सीरीजमधील लेटेस्ट हँण्डसेट मोटो जी4 आणि मोटो जी4 प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.


 
मोटो जी4 प्लस 16 जीबी स्टोरेज आणि 2 जीबी रॅम व्हेरिएंट 13,499 रुपयात उपलब्ध आहे. तर 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 14,999 निश्चित करण्यात आली आहे. तर मोटो जी4 ची किंमतीची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन इंडियावर मिळणार आहे.

 

मोटो जी 4 आणि मोटो जी4 प्लस यांचे फिचर्स जवळपास सारखेच आहेत. यात फरक फक्त कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सरचा आहे. मोटो जी4 चा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. तर जी4 प्लसचा रिअर कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. तसेच मोटो जी4 प्लसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर फिचर देखील आहे. फिंगरप्रिंट सेन्सर असणारा मोटोरोलाचा पहिलाच स्मार्टफोन आहे.

 

फिचर्स:

 

मोटो जी4 आणि जी4 प्लसमध्ये 5.5 इंच फूल-एचडी (1920x1080 पिक्सल डिस्प्ले आहे. अँड्रॉईड 6.1 मार्शमेलो आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शनही आहे. 1.5 गीगाहर्त्झ ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर आहे. 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम असून 32 जीबी व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आहे. या 4जी स्मार्टफोनमध्ये 128 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येणार आहे.

 

मोटो जी4 प्लसमध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तर जी4 मध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 3000 mAh बॅटरी क्षमता आहे.