Elon Musk in Twitter : टेस्लाचे (Tesla) सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये (Twitter) 9.2 टक्के शेअर्स विकत घेतले. यानंतर एलॉन मस्क ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होतील अशा बातम्या समोर आल्या होत्या. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट करून इलॉन मस्क यांचे स्वागत केले. त्यानंतर आता पराग अग्रवाल यांनी माहिती दिली आहे की, एलॉन मस्क ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होणार नाहीत. पराग अग्रवाल यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. 


पराग अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होण्यास नकार दिला आहे. दरम्यान एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होण्यास नकार देण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पराग यांनी सांगितलं की, संचालक मंडळात सामील असोत किंवा नसोत, आम्ही आमच्या शेअर होल्डर्सच्या सूचना आणि मतांना नेहमीच महत्त्व देतो. एलॉन हे ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत आणि आम्ही त्यांच्या सूचनांसाठी तत्पर आहोत.


पराग अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'एलॉन मस्क यांची संचालक मंडळात नियुक्ती अधिकृतपणे 9 एप्रिलपासून लागू होणार होती. परंतु एलॉन यांनी त्याच दिवशी सकाळी संचालक मंडळात सामील होणार नसल्याचे सांगितले. आम्हांला आशा आहे की, त्यांनी हा निर्णय भल्यासाठी घेतला असेल.'






 


एलॉन मस्क ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर
एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांनी
ट्विटरचे 9.2 टक्के शेअर्स खरेदी केले. यानंतर एलॉन मस्क हे ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले आहेत. पराग अग्रवाल यांना एलॉन मस्क ट्विटरच्या संचालक मंडळामध्ये समाविष्ट होतील अशी माहितीही दिली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha