Google : आता तुम्ही घरीच तुमचा गुगल पिक्सेल स्मार्टफोन दुरूस्त करू शकणार आहात. गुगलने नुकतीच त्यांच्या "सेल्फ रिपेअर प्रोग्राम"ची घोषणा केली आहे. ह्यासाठी गुगलने ॲानलाईन रिपेअर कम्युनिटी आयफिक्सइट (iFixit) सोबत करार केला असून त्याद्वारे गुगल पिक्सल यूजर्सना जेन्युअन गुगल पिक्सल पार्ट आणि त्यासाठीचे रिपेअर गाईड हे घरीच उपलब्ध करून दिले जातील. गुगल पिक्सेल 2 ते आता मागच्याच वर्षी लॉन्च झालेला गुगल पिक्सेल 6 प्रो पर्यंतच्या सर्व स्मार्टफोनचे जेन्युअन पार्ट हे आयफिक्सइट (iFixit) ह्या कम्युनिटीच्या iFixit.com ह्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातील. अमेरिका, इंग्लंड, कॅनडासह ॲास्ट्रेलियामध्ये या वर्षअखेरपर्यंत ही सेवा उपलब्ध होईल. 


गुगलच्या म्हणण्यानुसार, गुगल पिक्सलचे संपूर्ण स्पेअर पार्ट ज्यामध्ये बॅटरी, डिस्प्ले, कॅमेरा आणि इतर पार्ट हे स्वतंत्ररित्या किंवा आयफिक्सईट टूल किटसह उपलब्ध करून दिले जातील. ह्या टूलकिटमध्ये स्क्रू-ड्रायवरसह इतर अन्य गरजेची साहित्य दिली जातील. 


तर आयफिक्सइटच्या (iFixit) म्हणण्यानुसार ह्या किटमध्ये आयओपनर टूल किटसह सेक्शन हॅंडेल, 4mm प्रिसिजन बिट्स, सिम ईजेक्टर टूलसह अन्य महत्वाचे साहित्य देण्यात येतील. गुगल पिक्सल 5 पर्यंतच्या स्मार्टफोनची रिपेयर गाईडसुध्दा ह्यासोबत देण्यात येतील. आणि लवकरच उर्वरित पिक्सेल 5a ,6 आणि 6 प्रो स्मार्टफोनचे गाईड हे उपलब्ध करून दिले जातील.


गुगलने ह्या आधीच एसर (acer) आणि लिनोवो (lenovo) सोबत करार करून त्यांच्या क्रोमबुक रिपेयर कार्यक्रमाची सुरूवात केली आहे.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha