Elon Musk on Twitter : टेस्ला कंपनीचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांचे ट्वीट्स हे अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. पण 21 जूननंतर एलॉन यांनी ट्विटरवर एकही ट्वीट शेअर केले नव्हते. ट्विटरवरील अनुपस्थितीचे कारण एलॉन यांनी अजून नेटकऱ्यांना सांगितले नाही मात्र आता एलॉन हे दहा दिवसांनंतर आज ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी दहा दिवसांनंतर काही ट्वीट्स शेअर केले आहे. पाहूयात एलॉन यांचे ट्वीट्स...
एलॉन मस्क यांनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट
दहा दिवस ट्विटरवर अॅक्टिव्ह नसणाऱ्या एलॉन मस्क यांनी आज चार ट्वीट्स शेअर केले आहेत. त्यामधील एका ट्वीटमध्ये त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. 'काल पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची संधी मिळाली.' असं कॅप्शन एलॉन यांनी फोटोला दिले. यामध्ये एलॉन यांच्यासोबत त्यांची चार मुले दिसत आहे.
यूट्यूबर Technoblade ला एलॉन यांनी वाहिली श्रद्धांजली
दुसऱ्या ट्वीटमध्ये एलॉन यांनी प्रसिद्ध यूट्यूबर Technoblade ला श्रद्धांजली वाहिली. Technoblade चे काल(1 जून) वयाच्या 23 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. Technoblade चे मूळ नाव अॅलेक्स होते. त्याचे YouTube वर जवळपास 12 मिलियन फॉलोअर्स होते.
'Feeling … perhaps … a little bored?' असंही ट्वीट एलॉन यांनी आज ट्वीटरवर शेअर केलं आहे.
'व्हेनिस, महान स्मरणस्थळ', असं कॅप्शन देऊन एलॉननं एक फोटो देखील शेअर केला.
याआधी एलॉन हे जून 2020 मध्ये काही दिवस ट्विटरवर अॅक्टिव्ह नव्हते. त्यावेळी मुलाच्या जन्मानंतर 'काही वेळेसाठी ट्विटर ऑफ करत आहे.', असं ट्वीट करुन एलॉन यांनी त्यांच्या ट्विटर ब्रेकबाबत सांगितलं. त्यानंतर चार दिवसांनी एलॉन हे ट्विटरवर अॅक्टिव्ह झाले होते. 2019 मध्ये देखील एलॉन यांनी तीन दिवस ट्विटर अकाऊंटवर कोणतेही ट्वीट शेअर केले नव्हते. यावेळी ट्विटरवरुन एवढे दिवस लांब राहण्याचे कारण मात्र एलॉन यांनी नेटकऱ्यांना सांगितलं नाही.
हेही वाचा :