Iphone 13 : पुन्हा एकदा Apple चा प्रीमियम स्मार्टफोन iPhone 13च्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. नुकत्याच सुरु असलेल्या सेलमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वर आयफोन 13 खूप कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होता. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानंतर सध्या iPhone 13 ऑनलाईन साईट्सवर स्टॉकमध्ये संपला आहे. आता काही जणांना आयफोन खरेदी करायचा होता आणि त्यांच्यासाठी ही संधी हुकली असेल, तर त्यांना आता आणखी संधी मिळणार आहे. सध्या, क्रोमा (Croma) प्लॅटफॉर्म एक नवीन ऑफर घेऊन आला आहे. दिवाळी सणाच्या सेल अंतर्गत, iPhone 13 क्रोमामध्ये मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे.


क्रोमाच्या या दिवाळी ऑफर अंतर्गत केवळ 51,990 रुपयांमध्ये iPhone 13 विकत घेता येणार आहे. क्रोमाच्या या सेलच्या अंतर्गत iPhone 13 ची किंमत 51,990 रुपये असल्याची माहिती क्रोमाच्या साईटवरही देण्यात आली आहे. आयफोन 13ची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे, म्हणजेच कंपनी या फोनवर सध्या 17,910 रुपयांची सूट देत आहे.


बँक कार्ड्सवरही मिळणार मोठी सूट


आयफोन 14 लाँच झाल्यानंतर भारतात आयफोन 13च्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. आता iPhone 13 ची विक्री 69,900 रुपयांना होत आहे. परंतु, Croma आणि Tata Neu अॅपद्वारे हा फोन अवघ्या 51,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. क्रोमाच्या या सेलमध्ये आयसीआयसी बँक, एचएसबीसी बँक, येस बँक, एसबीआय कार्ड, वन कार्ड इत्यादी निवडक बँक कार्ड्सवर 10 टक्क्यांपर्यंत झटपट सूट मिळणार आहे.


ऑफर कधी संपणार?


या ऑफर अंतर्गत ग्राहकाला क्रोमा आणि टाटा न्यू अॅपद्वारे 51,999 रुपयांमध्ये iPhone 13 खरेदी करता येणार आहे. Apple स्मार्टफोनवरील ही ऑफर 26 सप्टेंबरपासून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सवलतीच्या दरात आयफोन 13 खरेदी करता येणार आहे. 51,999 रुपयांच्या ऑफर किंमतीत विविध ऑफर्स देखील सामील आहेत. यामध्ये विविध बँक कार्ड्सवर त्वरित डिस्काउंट मिळू शकतो. क्रोमा आपल्या ऑफलाईन स्टोअर्समध्ये फायनान्सिंग पर्यायांवर 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील देत आहे. तर, ही ऑफर किंमत केवळ स्टॉक संपेपर्यंत वैध असणार आजे. ऑफर कधी संपणार याबाबत क्रोमाने कोणतीही माहिती दिलेली नाही.


संबंधित बातम्या :


iPhone without charger : चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर ॲपलला ‘या’ देशात बंदी, 20 कोटींचा दंड


Apple iPhone 14 Launch: iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा