Chinese hackers hacked Apple iPhone 13 Pro: प्रत्येक वर्षी चीनमध्ये चेंगदूमध्ये तियानफू चषकाचं (Tianfu Cup) आयोजन करण्यात येतं. हॅकिंगच्या स्पर्धेत चीनमधील अनेक हॅकर्स आपलं कौशल्य दाखवत असतात. नुकतीच चीनमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कुनलुन लॅब टीमने चक्क Apple चा लेटेस्ट स्मार्टफोन iPhone 13 Pro ला फक्त १५ सेकंदात हॅक करुन दाखवलं. iOS 15.0.2 वर चालणाऱ्या iPhone 13 Pro ला दोन वेळा हॅक करण्यात आलं.


iPhone 13 Pro संपूर्ण सुरक्षासह हा फोन तयार करण्यात आलाचा दावा कंपनीनं केला होता. iPhone 13 Pro हॅक केल्यानंतर ते म्हणाले की, हॅकिंगच्या मागे मोठी तयारी होती. गेल्या काही दिवसांपासून यावर काम करत होतो. याला यश मिळालं. हॅकिंगचं हे कौशल्य पाहून उपस्थित सर्व लोक हैराण झाले होते. iPhone 13 Pro हॅक कसा करण्यात आला? याबाबतची कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. याबाबतची सर्व माहिती अॅपलकंपनीना दिली जाणार आहे. या स्पर्धेत फक्त कुनलुन लॅबच नव्हे तर आणखी एक टीमनेही iPhone 13 Pro हॅक केला आहे. टीम पंगुने या स्पर्धेत iPhone 13 Pro हॅक केला. त्याशिवाय अॅपलचे आयपॅड्सही हॅक करण्यात आले. iOS 15 काम करणाऱ्या iPhone 13 Pro या स्पर्धेत रिमोटवरुन जेलब्रेक करण्यात आलं. त्यासोबतच 300,000 डॉलर (2,25,16,905 रुपये) रिवॉर्डचा क्लेम करण्यात आला.  


Apple कंपनी आपल्या डिवायसच्या सुरक्षेची काळजी घेते. त्यामुळे त्यांच्या डिवायसेसला मोठी मागणी आहे. iPhone 13 Pro हॅक करणं कठीण असल्याचा दावा Apple ने केला होता. iPhone 13 Pro हॅक करणाऱ्या टीम याबाबतची सर्व माहिती अॅपल कंपनीला देणार आहेत.


संबधित बातम्या :


Apple iPhone 13 Pro Max : आयफोनचा असाही वापर! डोळ्यांवर उपचारासाठी होतेय मदत  


Apple iPhone 13 सीरिजमध्ये खास फीचर; नेटवर्कशिवाय करता येणार फोन आणि मेसेज