Tech News : Apple ची आगामी आयफोन 13 सीरिज लवकरच लाँच होणार आहे. ही सीरिज 14 सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाणार आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स आणत आहे, त्यातील सर्वात खास बात म्हणजे लो-अर्थ-ऑर्बिट (LEO) सॅटेलाइट कम्युनिकेशन मोड. या विशेष तंत्रज्ञानाअंतर्गत, यूजर्स नेटवर्कशिवाय देखील कॉल आणि मेसेज करू शकतात. आयफोन 13 सीरिजच्या नव्या स्मार्टफोनबद्दल आणखी जाणून घेऊयात.
 
नेटवर्कशिवाय कॉल करू शकतो


अॅपल आयफोन 13 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये येणारे हे विशेष तंत्रज्ञानामुळे यूजर्सना 4G/5G नेटवर्क स्मार्टफोनमध्ये येतं की नाही याची चिंता करण्याची गरज नाही. कारण नेटवर्क नसेल तरी मेसेज पाठवण्याची आणि फोन कॉल करण्याची सुविधा या फोनमध्ये देण्यात येईल. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे तर वापरकर्ते नेटवर्कशिवाय कोणालाही कॉल किंवा मेसेज पाठवू शकतील. अडचणीच्या वेळी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. Apple ने 2019 मध्ये LEO Satellite X iPhone ची अंमलबजावणी सुरू केली, परंतु कंपनी पहिल्यांदाच आपल्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये हे विशेष वैशिष्ट्य देत आहे.


नव्या स्मार्टफोनमधील फीचर्स


Apple चे हे iPhones iOS 15, A15 bionic वर काम करतील. यामध्ये, इमेज प्रोसेसिंगसाठी लिक्विड क्रिस्टल पॉलिमर सर्किट बोर्ड व्यतिरिक्त, नाईट मोड कॅमेरा दिला जाऊ शकतो. नवीन क्वालकॉम एक्स 60 मॉडेल आणि वायफाय 6 ई सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो. यामध्ये 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. आयफोन 13 सीरिजला mmWave 5G साठी सपोर्ट मिळू शकतो. या वर्षी अनेक देशांना mmWave 5G कव्हरेज मिळणे सुरू होईल, जेणेकरून वापरकर्ते आयफोन 13 द्वारे हाय-स्पीड 5G कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतील. इतर 5G नेटवर्कपेक्षा mmWave नेटवर्कवर इंटरनेट स्फीड जास्त उपलब्ध आहे. पण त्याची किंमत देखील जास्त आहे.


या स्मार्टफोनची किंमत असेल


आयफोन 13 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर हा फोन Apple कमी किंमतीत लाँच करेल. रिपोर्ट्सनुसार, आगामी सीरिजची किंमत आयफोन 12 पेक्षा कमी असेल. आयफोन 13 च्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत $ 973 पर्यंत असेल म्हणजेच सुमारे 71,512 रुपये, जे आयफोन 12 च्या किंमतीपेक्षा 3,000 रुपयांपेक्षा कमी असेल. या व्यतिरिक्त, तुम्ही आयफोन 13 चे 128 जीबी मॉडेल 1051 डॉलर म्हणजेच सुमारे 77,254 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. तसेच, 256GB व्हेरिएंटची किंमत $ 1174 म्हणजेच 86,285 रुपये असू शकते.