मुंबई : देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडणारे आहेत. वाढीव इंधन दरांमुळे अनेकांच्याच आर्थिक गणितालाही याला फटरा बसत आहे. अशा परिस्थितीत, जे लोक दररोज दुचाकी घेऊन लांब प्रवास करतात ते कायमच अशा बाईक्स खरेदी करतात, ज्यांचं मायलेज जास्त आहे.
नवं तंत्रज्ञान आणि किंमत हे निकषही इथं महत्त्वाचे असतात. चला तर, मग देशातील अशाच सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक्स बद्दल जाणून घेऊया.
TVS Sport
टीवीएस स्पोर्ट बाईक ही देशात सर्वाधिक सर्वाधिक अॅव्हरेज देणारी बाईक ठरत आहे. बीएस6 या तंत्रावर ही बाईक आधारलेली आहे. यामध्ये 99.77 CCचं इंजिन आहे. बाईकचं डिझाईनही अतिशय आकर्षक आहे, शिवाय ही किंमतही अनेकांना परवडणारी आहे. दर दिवशी तुम्ही जर बाईकनं ऑफिसला किंवा इतर कोणत्या ठिकाणी जाणार असाल तर ही बाईक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. एक्स शोरुमध्ये या बाईकची किंमत 60 हजार रुपये इतकी आहे.
Bajaj CT 110
बीएस 6 इंजिन असणारी ही बाईकही सर्वाधिक मायलेज देते. या बाईकमध्ये 115.45 CCचं इंजिन आहे. 8.6 PS ची पॉवर आणि 9.81 Nm चा टॉर्क ही बाईक देते. या बाईकमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार प्रती लीटरमागे ही बाईक 70 किमी इतरं मा.लेज देते. या बाईकची एक्स शोरुम किंमत 60 हजार रुपये इतकी आहे.
अर्धशतकी खेळीनंतर विराट इशानला म्हणाला, 'ओए... चारो तरफ बॅट दिखा'
Hero passion pro
दुचाकी वाहनांसाठी हीरो या कंपनीला अनेकांचीच पसंती असते. हीरोची नवी बाईक, ही नव्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. या बाईकमध्ये, 110 CC चं सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 9.02 Bhp पॉवर आणि 9.79 Nm टॉर्क देते. या बाईकचं इंजिन XSens फ्यूल इंजेक्शन टेक्नोलॉजीवर आधारित आहे. कंपनीनं सांगितल्यानुसार ही बाईक प्रती लीटरमध्ये 68 किमी इतकं मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 70 हजार रुपये इतकी आहे.
Honda CD 110 Dream
होंडाची ही बाईक, मायलेजच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे. 109.5 CC इंजिन असणारी ही बाईक, 7500 Rpm वर 6.47 ची पॉवर आणि 5500 Rpm वर 9.3 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या फ्रंटला 130 mm ड्रम ब्रेक आणि रियरमध्ये 130 mm ड्रम ब्रेक आहे. प्रती लीटरमध्ये ही बाईक 74 किमी इतकं मायलेज देते. या बाईकची एक्स शोरुम किंमत 70 हजार रुपये इतकी आहे.