Google Translation: जगभरात मोठ्या प्रमाणात भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केला जातो. दुसऱ्या एखाद्या भाषेतील शब्द किंवा वाक्य आपल्याला माहित नसल्यास, ते आपल्या भाषेत जाणून घेण्यासाठी अनेक लोक हे गुगल ट्रान्सलेटचा वापर करतात. गुगलमध्ये जगभरातील जावपास 164 भाषांचे भाषांतर करता येते. आजच्या घडीला कोणत्याही भाषेचे सर्वात वेगवान भाषांतर फक्त गुगलवरच करता येते. जगभरातील अनेक देश गुगलच्या या सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र यापुढे चीनला याचा लाभ घेता येणार नाही. कारण गुगल इंजिनने चीनमधील गुगल ट्रान्सलेशन सेवा बंद केली आहे. तत्पूर्वी गुगलने उत्पादनांची निर्मिती चीनमध्ये बंद केली होती. या नंतर गुगलने आता ट्रान्सलेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी चीनने आधीच बऱ्याच देशांच्या सोशल मीडिया कंपन्यांद्वारे प्रदान केलेल्या सेवांवर बंदी घातली आहे.
गुगलने का केली सेवा बंद?
एका वृत्तानुसार, चीनमध्ये गुगल ट्रान्सलेटचा वापर कमी प्रमाणात होतो, म्हणून गुगलने आपली भाषांतर सेवा बंद केली आहे. आता चीनमध्ये गुगल सर्च इंजिन ओपन केल्यावर तिथे एक बेसिक सर्च बार आणि लीक स्क्रीनवर दिसते. ज्यावर क्लिक केल्यास ती हाँगकाँगमध्ये उपलब्ध कंपनीच्या वेबपेजवर नेते. या वेबपेजवर चीनने बंदी घातली आहे. चीनमधील अनेक नेटकाऱ्यानी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे की, त्यांना शनिवारपासून गुगल ट्रान्सलेट सेवेचा वापर करता येत नाही आहे. गुगलच्या क्रोम ब्राउझरमध्ये उपलब्ध असलेले ट्रान्सलेशन फीचर आता चीनमध्ये काम करत नसल्याचेही, चीनमधील नेटकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
गुगलने 2017 मध्ये लॉन्च केली होती ही सेवा
गुगलने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, चीनमध्ये कमी वापर होत असल्याने गुगल ट्रान्सलेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र चीनमधील किती युजर्स गुगल ट्रान्सलेट सेवेचा वापर करत होते, हे गुगलकडून सांगण्यात आले नाही. गुगलने 2017 मध्ये चीनमध्ये ट्रान्सलेट अॅप लॉन्च केले होते. चिनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी गुगलने प्रसिद्ध चीनी-अमेरिकन रॅपर एमसी जिन यांच्याकडून जाहीर देखील केली होती.
महत्वाच्या बातम्या
Redmi Note 12 Pro Plus: Redmi लॉन्च करत आहे जगातील सर्वात वेगवान चार्जिंग फोन, 10 मिनिटात होईल पूर्ण चार्ज, जाणून घ्या
Elon Musk : एलॉन मस्कनं लॉन्च केला हुबेहुब माणसासारखा दिसणारा रोबोट; तुमची सर्व कामं करणार, पण किंमत ऐकून डोळेच विस्फारणार