Reliance Jio Laptop :  उद्योगपती मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओ  (Reliance Jio )  लवकरच 4G सिम कार्ड-लेस लॅपटॉप बाजारात आणत आहे. रिलायन्स जिओचा दावा आहे की, हा लॅपटॉप जिओ फोनप्रमाणे भारतीय बाजारपेठेतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल. रिलायन्स जिओच्या 4G सिम कार्ड लॅपटॉपची किंमत 15,000 रुपये असेल. सर्वसामान्यांचे बजेट लक्षात घेऊन या लॅपटॉपची किंमत निश्चित करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 


रिलायन्स जिओने JioPhone ची देखील किंमत सर्व सामान्यांना परवडेल अशी ठेवली आहे. त्याच प्रमाणे आता सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत लॅपटॉप बाजारात आणण्याचे रिलायन्सने उद्दिष्ट ठेवले आहे. JioBook लॅपटॉपसाठी यूएस-आधारित वायरलेस टेलिकम्युनिकेशन उत्पादने बनवण्यासाठी रिलायन्स ग्रुपने क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली आहे. याबरोबरच चांगल्या तंत्रज्ञानासाठी आर्म लिमिटेड आणि विंडोज ओएस कंपनीद्वारे अॅप्सद्वारे संगणकीय चिप्स तयार केल्या जात आहेत, अशी माहिती रिलायन्सकडून देण्यात आली आहे.  


तीन महिन्यात लॅपटॉप बाजारात येणार


रिलायन्स जिओकडे भारतातील 420 दशलक्ष ग्राहकांसह भारतातील सर्वात मोठे टेलिकॉम नेटवर्क आहे. रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लॅपटॉप लवकरच देशातील शाळा आणि सरकारी संस्थांसाठी उपलब्ध होणार आहे. येत्या तीन महिन्यांत तो बाजारात येण्याची शक्यता आहे. 


काउंटरपॉइंट विश्लेषक तरुण पाठक यांनी सांगितले की, भारतीय बाजारपेठेत JioBook लॅपटॉप लॉन्च केल्याने लॅपटॉपची मागणी 15 टक्क्यांनी वाढू शकते. Jio लॅपटॉपची स्वतःची JioOS ऑपरेटिंग सिस्टम असेल आणि JioStore वरून अॅप्स डाउनलोड करण्याची सुविधा असेल. रिसर्च फर्म IDC च्या मते, गेल्या वर्षी भारतात एकूण वैयक्तिक संगणक शिपमेंट 14.8 दशलक्ष युनिट्स होते, ज्यात HP, Dell आणि Lenovo च्या संगणकांचा समावेश आहे.  


सर्वात स्वस्त लॅपटॉप


बाजारात सध्या कमीत कमी 20 हजार रूपयांपासून लॅपटॉपच्या किमती आहेत. परंतु, रिलायन्सचे हे लॅपटॉप 15 हजार रूपयांना मिळणार आहे. त्यामुळे रिलायन्सचा हा लॅपटॉप सर्वात स्वस्त असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. 


महत्वाच्या बातम्या


Redmi Note 12 Pro Plus: Redmi लॉन्च करत आहे जगातील सर्वात वेगवान चार्जिंग फोन, 10 मिनिटात होईल पूर्ण चार्ज, जाणून घ्या 


Elon Musk : एलॉन मस्कनं लॉन्च केला हुबेहुब माणसासारखा दिसणारा रोबोट; तुमची सर्व कामं करणार, पण किंमत ऐकून डोळेच विस्फारणार