Elon Musk : माणसांसारखे काम करणारे रोबोट (Robot) आपण अनेक चित्रपटांत पाहिले आहेत. अगदी हूबेहूब काम करणारे हे रोबोट सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. मात्र, चित्रपटांत दिसणारी ही कल्पनाशक्ती आता केवळ चित्रटांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्युमनॉइड रोबोटचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एआय डे (Tesla AI Day) इव्हेंटमध्ये ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिमस लॉन्च केला आहे. 


ह्युमनॉइड रोबोट (Humanoid Robot) म्हणजेच माणसासारखा दिसणारा रोबोट. हा रोबोट तुम्हाला अनेक प्रकारच्या कामातही मदत करेल. त्याची रचना अगदी माणसांसारखी बनवली आहे. सध्या हा रोबोटचा प्रोटोटाईप दाखविण्यात आला आहे. स्टेजवर चालण्याबरोबरच या रोबोटने बसलेल्या प्रेक्षकांसमोर हातही हलवले. या संदर्भात एक व्हिडीओ दाखविण्यात आला. ज्यामध्ये रोबोट एक बॉक्स उचलत होता. याशिवाय झाडांना पाणीही देत आहे. टेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिमस (Optimus) अनेक कामे सहजतेने पूर्ण करू शकतो हे यावरून दिसून येते. 


पाहा व्हिडीओ :






टेस्ला ऑफिस, कॅलिफोर्निया येथे एआय डे (Tesla AI Day) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मस्क यांनी सांगितले की, शक्य तितक्या लवकर उपयुक्त मानवी रोबोट तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. मस्क यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या रोबोबद्दल पहिल्यांदा माहिती दिली होती. आता त्याचा प्रोटोटाईप दाखवण्यात आला आहे. 


मस्कच्या मते, इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी लाखो ऑप्टिमस तयार करेल. या रोबोटची किंमत साधारण 16 लाख रूपये असेल. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मस्क यांनी पुढे सांगितले की, कंपनी येत्या 3 ते 5 वर्षांत ऑर्डर घेणे सुरू करेल. मात्र, या रोबोटवर अजून बरेच काम करायचे आहे. मात्र, साधारण 5 ते 10 वर्षांत या रोबोटमध्ये अनेक बदल दिसून येतील असेही कंपनीने म्हटले आहे.  


महत्वाच्या बातम्या :