Sarahah अॅपवर आता तुमची ओळख गुप्त राहणार नाही?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2017 12:24 PM (IST)
sarahahexposed या नावाच्या एका वेबसाइटनं दावा केला आहे की Sarahahवर मेसेज करणाऱ्या यूजर्सची माहिती यापुढे तुम्हाला मिळेल.
NEXT
PREV
मुंबई : सोशल मीडियावर Sarahah या अॅपनं गेल्या काही दिवसांपासून बराच धुमाकूळ घातला आहे. फेसबुकवर हे अॅप बरंच व्हायरल झालं आहे. Sarahahवर तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट लिहू शकता आणि तुमची ओळखही लपवू शकतात.
Sarahahवर तुमच्याबाबत कोणीही लिहू शकतं. पण नेमकं कोण लिहतंय हे समजू शकत नाही.
आपल्याबद्दल नेमकं कोण लिहतंय याची आपल्याला बरीच उत्सुकता असते. यूजर्सची ही उत्सुकता लक्षात घेता sarahahexposed या नावाच्या एका वेबसाइटनं दावा केला आहे की Sarahahवर मेसेज करणाऱ्या यूजर्सची माहिती यापुढे तुम्हाला मिळेल.
sarahahexposedनं केलेला दावा खरा आहे की खोटा हे तपासण्यासाठी आम्ही या वेबसाइटवर गेलो. तेव्हा याचं लेआऊट अगदी Sarahah सारखंच असल्याचं दिसून आलं. यावेळी पेजवर काही लोकांचे लाईव्ह कमेंट दिसत होते. या पेजवर तुम्हाला बोल्ड अक्षरात Enter Name ऑप्शन पाहायला मिळेल. पण तुम्ही जेव्हा तुमचं Sarahahचं यूजर नेम टाकाल तेव्हा तुम्हाला काहीही दिसणार नाही. त्यामुळे sarahahexposedचा दावा खोटा असल्याचं समजतं. ही वेबसाइट क्लिक मिळवून पैसे कमावत आहे. तर तुम्हाला असा कोणताही मेसेज मिळाला असेल तर यावर क्लिक करु नका.
Sarahah अॅपचा दावा आहे की तुमचा डेटा एनक्रिप्टेड आहे जो डिकोड करता येणार नाही. या अॅपमध्ये मेसेज नेमकं कोण पाठवतं हे समोर येत नाही. आतापर्यंत कोणतंही वेब प्लॅटफॉर्म Sarahahची डेटा सुरक्षा मोडू शकलेलं नाही.
Sarahah वर अकाऊण्ट कसं ओपन कराल?
गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरुन तुम्ही Sarahah अॅप डाऊनलोड करु शकता. iOS फाइल 22 एमबी, तर अँड्रॉईड फाईल 12 एमबीची आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही साईन इन करा.
तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील. मात्र मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला समजणार नाही, हीच या अॅपची गंमत आहे.
संबंधित मेसेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज बॉक्स दिसेल. त्यावर तुम्ही तुमचं उत्तर लिहून पाठवू शकता. सौदी अरेबियातील जेन अबीदिन तौफिकने हे अॅप तयार केलं आहे. हे सोशल मीडिया अॅप असून जुलै 2017 मध्ये लेटेस्ट अपडेट करण्यात आलं आहे.
Sarahah चे साइड-इफेक्ट काय आहेत?
मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राहणार असल्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणालाही कशाही प्रकारचा मेसेज पाठवू शकते. यामध्ये शिवराळ किंवा अश्लील मेसेजचाही समावेश होतो. तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटणार नसल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे. अर्थातच अशा मेसेजविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या :
काय आहे Sarahah अॅप? तुमची ओळख गुप्त कशी राहते?

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -