मुंबई : PUBG Mobile India प्रेमींची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण Battlegrounds Mobile India च्या प्री रजिस्ट्रेशनला आज सुरुवात होत आहे. दक्षिण कोरियाई गेम डेव्हलपर्स कंपनी Krafton कडून यासंबंधीची घोषणा करण्यात आली. फक्त आणि फक्त अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांसाठीह ही सुविधा 18 मे रोजी उपलब्ध असणार आहे. आयफोन वापरणाऱ्यांसाठी ही सुविधा केव्हा उपलब्ध करुन दिली जाईल, याबाबत मात्र अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही. इथं महत्त्वाची बाब म्हणजे हा गेम अँड्रॉईड आणि आयफोन युजर्ससाठी पूर्णपणे मोफत असू शकतो.  


पब जी चं भारतीय व्हर्जन असणारा Battlegrounds Mobile India जूनमध्ये सुरु होणार असून, यासाठी प्री रजिस्टर करणाऱ्यांना खास रिवॉर्डही मिळणार असल्याचं क्राफ्टनकडून सांगण्यात आलं आहे. 


Majha Katta With Dr Vijay Bhatkar : भारताच्या संगणक क्रांतीचे शिल्पकार पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचा जीवनप्रवास!


प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या फॅन्सना मिळणार रिवॉर्ड्स 


प्री रजिस्ट्रेशन करणारे फॅन्स स्पेसिफिक रिवॉर्ड्ससाठी क्लेम करु शकणार आहेत. हे रिवॉर्ड्स केवळ भारतीय प्लेयर्ससाठीच असणार आहेत. प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी युजर्सना गुगल प्ले स्टोअरवर जाऊन 'प्री-रजिस्ट्रेश' बटनवर क्लिक करावं लागेल. गेम लॉन्च झाल्यानंतर क्लेम करण्यासाठी रिवॉर्ड्स आपोआप उपलब्ध होतील. पबजी मोबाईलप्रमाणेच हा गेम सर्व युजर्सना खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 


पालकांचा नंबर द्यावा लागणार 


गेम डेवलपर्स क्राफ्टनने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांखालील गेम खेळणाऱ्या मुलांसाठी नियम काही अंशी कठोर ठेवण्यात आले आहेत. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम खेळण्यासाठी या मुलांना पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्यासाठी त्यांना पालकांचा दुरध्वनी क्रमांकही द्यावा लागणार आहे.