Battlegrounds Mobile India Pre-registration : PUBG Mobile चे भारतात लाखो चाहते आहेत. भारतात पबजीवर बंदी घातल्यानंतर पबजी प्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. पण आता पबजी भारतात परतत आहे. नव्या रंगात, नव्या ढंगात Battlegrounds Mobile India च्या नावानं पबजी भारतात परतत आहे. 


दक्षिण कोरियाई गेम डेव्हलपर्स कंपनी  Krafton ने Battlegrounds Mobile India च्या प्री-रजिस्ट्रेशनच्या तारीखेची घोषणा केली आहे. गेमच्या प्री-रजिस्ट्रेशन 18 मेपासून गुगलच्या प्ले स्टोअरवरुन करता येणार आहे. गेम केव्हा रिलीज होणार, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, प्री-रजिस्ट्रेशन लिंक ओपन झाल्यानंतर लवकरच गेमही लॉन्च होईल, अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. अद्याप गेम iOS युजर्ससाठी कधी लॉन्च होणार, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या फॅन्सना मिळणार रिवॉर्ड्स 
 
कंपनीने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, प्री रजिस्ट्रेशन करणारे फॅन्स स्पेसिफिक रिवॉर्ड्ससाठी क्लेम करु शकणार आहेत. हे रिवॉर्ड्स केवळ भारतीय प्लेयर्ससाठीच असणार आहेत. प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी युजर्सना गुगल प्ले स्टोअरवर जाऊन 'प्री-रजिस्ट्रेश' बटनवर क्लिक करावं लागेल. गेम लॉन्च झाल्यानंतर क्लेम करण्यासाठी रिवॉर्ड्स आपोआप उपलब्ध होतील. पबजी मोबाईलप्रमाणेच हा गेम सर्व युजर्सना खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 



डेटा सिक्युरिटीची काळजी 


कंपनीने सांगितलं की, यंदा डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसीबाबत काळजी घेण्यात आली आहे. क्राफ्टनने सांगितलं की, यंदा युजर्सचा डेटा देशात स्टोअर करण्यात आलं आहे. त्याचसोबत यावेळी लॉ-रेग्युलेशनचीही काळजी घेण्यात आली आहे. कंपनीने या गेमनंतर इतर गेम अॅपही लॉन्च केले आहेत. जे सध्या भारतात अवेलेबल नाहीत. 


पालकांचा नंबर द्यावा लागणार 


गेम डेवलपर्स क्राफ्टनने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांखालील गेम खेळणाऱ्या मुंलांसाठी नियम थोडे कठोड करण्यात आले आहे. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम खेळण्यासाठी या मुलांना पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच पालकांचा नंबरही द्यावा लागणार आहे.