Audi Q7 Model: ऑडी क्यू 7 हे ऑडीच्या सर्वात लोकप्रिय मॉडेलपैकी एक आहे. कंपनीनं काही वर्षांपूर्वी भारतात जर्मन लक्झरी ब्रँडची स्थापना केली होती. आता नवीन क्यू 7 पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. कंपनी मागील क्यू 7 मध्ये अनेक बदल करून बाजारात दाखल करणार आहे. नवीन मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, मोठ्या सिंगल फ्रेम ऑडी ग्रिल आणि नवीन एअर इनटेकसह नवीन क्यू 7 आता अधिक स्टायलिश लूकसह मिळणार आहे. तसेच या नव्या कारमध्ये नवीन रंगाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
या कारमध्ये नवीन बॉडी क्लॅडिंग आणि मोठ्या चाकांसह सुधारित बंपर सेट-अप देखील देण्यात आलाय. तसेच या कारच्या इंटरिअरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कारचं संपूर्ण डिझाइन बदलण्यात आली आहे. ज्यामुळं अधिक स्टायलिश लूक मिळणार आहे.
कारच्या इंटिरिअरमध्ये नवीन क्रोम/अॅल्युमिनियम हायलाइट्ससह दोन टचस्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रमेंट क्लस्टर देखील आहे. याशिवाय, प्रीमियम ऑडिओ सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल आणि हेड-अप डिस्प्ले यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. सर्व नवीन ऑडी कारप्रमाणे, क्यू 7 फक्त पेट्रोलवर असेल. सध्या ऑडी कंपनी त्यांच्या क्यू 5 लॉन्च करण्याकडं अधिक लक्ष देत आहेत. ऑडी क्यू 7 पुढच्या वर्षी भारतीय बाजारात धडकणार असल्याची माहिती मिळत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- New Volvo XC60 Review: व्होल्वोची नवी XC60 SUV, नव्या दमदार फिचर्ससह आरामदायी प्रवास
- Motorola Moto G51 5G : मोटोरोलाचा नवा मोबाईल 10 डिसेंबरला लाँच होण्याची शक्यता
- Mercedes AMG A 45 S : स्पोर्टस कारला टक्कर देणारी 'Mercedes AMG A 45'
- Volkswagenची नवी Tiguan प्रीमियम SUV, 'या' SUVना देणार टक्कर, खास फिचर्स, भन्नाट लूक