Apple WWDC 2022 : Apple ची वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2022 आज होणार आहे. 6 जूनपासून सुरू होणाऱ्या या चार दिवसीय कार्यक्रमात अनेक चांगले प्रोडक्ट्स आणि सॉफ्टवेअर दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान iOS, macOS आणि Watch OS सादर केले जातील. Apple च्या इव्हेंटमध्ये कोणकोणते प्रोडक्ट लॉन्च होणार आहेत ते जाणून घ्या.   


macOS 13


WWDC इव्हेंटमध्ये नवीन macOS व्हर्जन येण्याची शक्यता आहे. Apple नवीन macOS 13 MacBooks आणि iMacs साठी सादर करेल. अशी अपेक्षा आहे की, नवीन OS काही मनोरंजक फीचर्स यामध्ये अॅड होऊ शकतात जे यूजर्सना अधिक आकर्षित करतील.   


ऍपल हेडसेट, मॅकबुक एअर, मॅक प्रो


सॉफ्टवेअर व्यतिरिक्त ऍपल इव्हेंटमध्ये आणखी नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करणार आहे. Apple नवीन MacBook Air 2022 देखील WWDC 2022 इव्हेंटमध्ये लॉन्च करू शकते. नवीन MacBook M2 चिपसेटसह येऊ शकते, जे मागील मॉडेलपेक्षा मोठे कार्यप्रदर्शन अपग्रेड आणू शकते. इव्हेंटमध्ये सिलिकॉनवर चालणारा मॅक प्रो देखील लॉन्च केला जाऊ शकतो. हार्डवेअर लॉन्च सहसा WWDC इव्हेंटमध्ये मर्यादित असताना, Apple अजूनही यापैकी काही उपकरणांसह आम्हाला आश्चर्यचकित करू शकते.


दरम्यान, कंपनी केवळ समर्पित कार्यक्रमांद्वारे हार्डवेअर लॉन्च करते. अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, WWDC कीनोटच्या दरम्यान, नवा Mac डिव्हाइस लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये नवीन MacBook Air चा समावेश असू शकतो. याव्यतिरिक्त दुसरं डिव्हाइस लॉन्च केलं जाऊ शकतं. 


महत्वाच्या बातम्या :