UPI Payment : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ही आजकाल सर्वाधिक वापरली जाणारी ऑनलाइन पेमेंट पद्धत आहे. तुम्ही काही मिनिटांत UPI द्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकता. परंतु, अनेक वेळा UPI ऑनलाइन पेमेंट करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वापरकर्त्यांना त्रास होतो. अशा परिस्थितीत, या समस्येवर मात करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने रिअल टाइम पेमेंट विवाद निराकरण प्रणाली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.


रिअल टाइम पेमेंट विवाद निराकरण प्रणाली लवकरच सुरू होईल
हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, एनपीसीआय लवकरच रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिझोल्यूशन सिस्टम सुरू करणार आहे. ही प्रणाली सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू होईल. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर तुमच्या पेमेंट समस्या 90 टक्क्यांपर्यंत कमी होतील. त्यामुळे यूपीआयवरून पेमेंट करणाऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. 


बँकेत पुन्हा पुन्हा कॉल करण्यापासून सुटका होणार
ही नवीन प्रणाली तयार केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा बँकेला कॉल करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या UPI अॅपवर या प्रणालीद्वारे तुम्हाला काही मिनिटांत मदत मिळू शकेल. यासोबतच तुमची मदत रिअल टाइममध्ये आपोआप होईल. यामुळे UPI मध्ये अडकलेल्या पैशांची समस्या जवळपास 90 टक्क्यांनी कमी होणार आहे.


देशात UPI चा वापर वाढता 
गेल्या काही वर्षांत UPI चा वापर खूप वेगाने वाढला आहे. UPI च्या माध्यमातून तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात रिअल टाइममध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. आजकाल लोक Google Pay, PhonePe, Bharat Pay, Paytm इत्यादी विविध अॅप्सद्वारे सहजपणे UPI पेमेंट करू शकतात. 


महत्वाच्या बातम्या


UPI Payment : 'या' कोडद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय UPI वरून पैसे पाठवू शकता; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया


Google Password : लवकरच सर्व पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासातून सुटका! गुगल, अ‍ॅपल आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठी घोषणा