WhatsApp New Feature : व्हॉट्सअॅप हे एक प्लॅटफॉर्म आहे, जे आज बहुतेक लोक वापरतात. या अॅपमध्ये अनेक मनोरंजक वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यामुळे चॅटिंग आणखी सोपे आणि मजेदार बनते. व्हॉट्सअॅपवर मेसेज डिलीट करण्याची सुविधा आहे, ज्यामुळे तुम्ही स्वत:चे तसेच तुमच्या समोरच्या व्यक्तीसाठी मेसेज डिलीट करू शकता. आता असे एक फीचर रिलीज होत आहे, ज्याद्वारे तुम्ही डिलीट केलेले मेसेज देखील परत मिळवू शकता.
WhatsApp चे नवीन फीचर
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, चॅटिंग प्लॅटफॉर्म WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचर अंतर्गत, हे अॅप आपल्या सर्व युझर्ससाठी चॅटिंग अधिक सुलभ करणार आहे. आता युजर्स चॅटिंग करताना 'Undo' बटण वापरू शकणार आहेत. हे फीचर अजून रिलीज करण्यात आलेले नाही, पण WhatsApp यावर काम करत आहे. जेणेकरून युझर्सना याचा उपयोग होऊ शकेल.
व्हॉट्सअॅप वरील डिलीट केलेले मेसेज परत पाहता येणार!
व्हॉट्सअॅप ज्या फीचरवर काम करत आहे त्याबद्दल तुम्हाला जाणून आनंद होईल. कारण व्हॉट्सअॅपवर येणारे 'Undo' बटण हे असे साधन आहे की, तुम्ही डिलीट केलेला मेसेज परत आणू शकाल, म्हणजेच तो परत मिळवू शकाल. अनेक वेळा असे घडते की, 'डिलीट फॉर एव्हरीवन' ऐवजी तुम्ही 'डिलीट फॉर मी' असा मेसेज बदलता. हे बटण अशा वेळेसाठी आहे.
व्हॉट्सअॅपवर 'Undo' बटण कसे काम करेल?
हे नवीन फिचर आल्यावर ते कसे काम करेल? तर जेव्हा तुम्ही मेसेज 'डिलीट फॉर मी' करताच तुमच्या स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल. यामध्ये तुम्हाला डिलीट केलेला मेसेज 'Undo' करण्याचा पर्याय दिला जाईल. हे करण्यासाठी तुम्हाला फक्त काही सेकंद किंवा मिनिटे दिली जातील. हे फीचर टेलिग्राम सारख्या इतर चॅटिंग अॅपवर आधीपासूनच उपलब्ध आहे.
काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, व्हॉट्सअॅप देखील आपल्या युझर्सना मेसेज एडिट करण्याची परवानगी देणार आहे आणि व्हॉट्सअप 'एडिट' बटणावर काम करत आहे. अलीकडेच व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी मेसेज रिअॅक्शन फीचरही जारी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
WhatsApp Feature : अँड्रॉइड आणि आयफोन यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर्स लवकरच, वाचा संपूर्ण माहिती
Madras High Court : मद्रास उच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच व्हॉट्सॲपवर सुनावणी, न्यायालयाची रथयात्रेला सशर्त मंजुरी