Apple WWDC 2022 Live Streaming : Apple चा सर्वात मोठा इव्हेंट WWDC 2022 आज होणार आहे. यामध्ये नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व्यतिरिक्त कंपनी नवीन मॅकबुक एअर देखील लॉन्च करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या इव्हेंटमध्ये अॅपल नेक्स्ट जेनरेशन हार्डवेयर युजर्ससाठी लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे.
WWDC 2022 लाइव्ह स्ट्रिमिंगची वेळ
WWDC 2022 कीनोट आज भारतीय वेळेनुसार, रात्री साडेदहा वाजता सुरू होईल. अॅपलच्या यूट्यूब चॅनेलद्वारे, हा कार्यक्रम थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, अॅपलची वेबसाइट, www.apple.com यावर अॅपल टीव्ही अॅप आणि अॅपल डेव्हलपर अॅपद्वारे देखील थेट प्रसारित केलं जाईल.
WWDC 2022 इव्हेंट
प्रत्येक वेळीप्रमाणे, यावेळी देखील WWDC 2022 कीनोटमध्ये, कंपनी अनेक सॉफ्टवेअर फोक्स्ड डेवलपमेंट्स लक्ष केंद्रीत करणार आहे. यामध्ये कंपनी iOS 16, iPadOS 16, macOS 13, watchOS 9 आणि tvOS 16 लॉन्च करू शकते.
अनेक रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, कंपनी यामध्ये एक नवीन मॅक डिव्हाइस देखील लॉन्च करू शकते. यामध्ये MacBook Air with M2 व्यतिरिक्त Mac mini आणि Mac Pro चाही समावेश असू शकतो.
iOS 16
iOS 16 बद्दल असं सांगितलं जात आहे की, हे यावर्षीच्या WWDC चं सर्वात मोठं आकर्षण असेल. आयफोनच्या या नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये नोटिफिकेशन्ससह मेसेज आणि हेल्थ अॅप्समध्ये अपडेट्स पाहता येतील.
iPadOS 16
या इव्हेंटमध्ये कंपनी iOS 16 प्रमाणे iPadOS 16 लाँच करू शकते. यामध्ये वापरकर्त्यांना इम्प्रूव्ड मल्टी टास्किंग एक्सपीरियंस मिळू शकतो.
दरम्यान, कंपनी केवळ समर्पित कार्यक्रमांद्वारे हार्डवेअर लॉन्च करते. अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, WWDC कीनोटच्या दरम्यान, नवा Mac डिव्हाइस लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये नवीन MacBook Air चा समावेश असू शकतो. याव्यतिरिक्त दुसरं डिव्हाइस लॉन्च केलं जाऊ शकतं.