Apple Watch Series 7 On Amazon : अॅमेझॉन आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळी ऑफर घेऊन येत असतात. अशीच नवीन ऑफर सध्या अॅमेझॉनवर सुरु आहे. तुम्हाला जर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी किंवा आई वडिलांसाठी अॅपल वॉच खरेदी करायंच असेल तर ही उत्तम संधी आहे. कारण तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती या वॉचमधून तुम्हाला मिळणार आहे. तसेच हे घड्याळ तुम्हाला 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत EMI वर खरेदी केले जाऊ शकते. या घड्याळात इतरही अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत मात्र सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या घड्याळात ECG चा ऑप्शन आहे. Apple Watch ने घरच्या घरी ECG कसा करायचा ते जाणून घ्या.




Apple Watch मध्ये ECG कसे केले जाते ?



  • Apple Watch Series 7 मधील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ECG. ECG करण्यासाठी सर्वात आधी iPhone 5.1.2 वर अपडेट करावा लागेल. त्यानंतर फोनमध्ये ईसीजी अॅप डाउनलोड करावे लागेल. अॅप डाउनलोड केल्यानंतर, घड्याळ फोनशी सिंक करावे लागेल. यानंतर हात सामान्य आराम मोडमध्ये ठेवा आणि ईसीजी चाचणी सुरू करा. 30 सेकंदाची ही चाचणी असेल तर टेस्ट केल्यानंतर लगेच त्याचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या फोनमध्ये दिसेल. 

  • तुम्ही हा चाचणी अहवाल आणि इतर काही लक्षणे जसे की, जलद हृदयाचा ठोका, हृदयाचे ठोके कमी होणे, धाप लागणे, थकवा किंवा इतर कोणतीही लक्षणे जाणवल्यास PDF मध्ये सेव्ह करू शकता. यामध्ये आरोग्याचा जुना डेटाही संग्रहित केला जाऊ शकतो.  

  • हे घड्याळ कमी आणि उच्च हृदय गतीच्या सूचना पाठवते आणि हृदयाच्या ठोक्यात अनियमितता असल्यास ते परिधान करण्याबद्दल माहिती मिळते. जर तुम्ही कुठे पडल्यास तर तुमचे घड्याळ आपोआप आपत्कालीन सेवेला कॉल करते.  


Apple Watch Series 7 (GPS, 41mm) किंमत :


या घड्याळाची किंमत 41,900 रुपये आहे. या घड्याळावर नो कॉस्ट ईएमआयचा (EMI) पर्याय देखील आहे. ज्यामध्ये तुम्ही कोणताही व्याज न भरता दरमहा 1,972 रुपयांच्या हप्त्यात त्याची किंमत देऊ शकता. या घड्याळात 41MM आणि 45MM चे दोन ऑप्शन आहेत.  घड्याळात 9 कलरचे पर्याय आहेत. या ऍपल वॉचमधला दुसरा प्रकार सेल्युलर म्हणजेच कॉलिंग आहे.


टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे . मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता , किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.


महत्वाच्या बातम्या :