FAU-G हा पहिला बॅटल रॉयल गेम आहे जो देशाती पब जी (PUBG) गेम म्हणून ओळखला जातो. आयफोन यूजर्ससाठीही हा गेम आता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आयफोन यूजर अॅपल अ‍ॅप स्टोअर वरून हा गेम डाउनलोड करू शकतात. यावर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा गेम लॉन्च करण्यात आला. यापूर्वी हा गेम केवळ अँड्रॉईड यूजर्ससाठीच उपलब्ध होता. तर आता अॅपल यूजर्सही या गेमचा आनंद घेऊ शकतील.


फियरलेस आणि युनायटेड गार्ड्स म्हणजेच FAU-G गेम हा पबजीप्रमाणेच एक बॅटल गेम आहे. बंगळुरूतील कंपनी nCoreने या गेमची निर्मिती केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने पबजीला बंदी घातल्यानंतरच मेड इन इन इंडिया FAU-G गेम सुरू करण्याची घोषणा केली होती.


PUBG गेम FAU-G पेक्षा वेगळा


FAU-G गेमची तुलना पबजीशी करण्यासंबंधीत कंपनीने म्हटले आहे की, हा गेम पबजीपेक्षा वेगळा आहे. FAU-G विना मल्टीमोड लॉन्च केले गेले आहे. तर पबजीमध्ये मल्टीप्लेअर मोड आहे. दोन खेळांमधील हा एक मोठा फरक आहे. याशिवाय ग्राफिक्सबाबत FAU-G गेमही पबजीपेक्षा भारी आहे. FAU-G गेमची साईज 500MB आहे. FAU-G हिंदी भाषेत लॉन्च करण्यात आला आहे. तर पबजी इंग्रजीमध्ये उपलब्ध होता.


आला रे आला! PUB-G ला टक्कर द्यायला FAU-G आला; अक्षय कुमारकडून व्हिडीओ ट्वीट


कमाईतील काही वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान करणार


अक्षय कुमारने म्हटलं होतं की, "पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक गार्ड्स - फौजी. मनोरंजनातून खेळाडूंना आपल्या सैनिकांचा त्याग समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा 20 टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे."