FAU-G Game : देशी पबजी म्हणून ओळखला जाणारा भारतीय बॅटल रॉयल गेम FAU-G आता आयफोन युजर्ससाठीही अवेलेबल करण्यात आला आहे. अॅपल स्टोअरवरुन आयफोन युजर्सना FAU-G गेम डाऊनलोड करता येणार आहे. या वर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी हा गेम लॉन्च करण्यात आला होता. पहिल्यांदा हा गेम केवळ अँड्रॉईड युजर्ससाठी अवेलेबल करण्यात आला होता. आता आयफोन युजर्ससाठीही हा गेम लॉन्च करण्यात आला आहे.  


लोकप्रिय मोबाईल गेम PUBG भारतात बॅन केल्यानंतर पबजी प्रेमींमध्ये निराशा पसरली होती. परंतु, पबजी सारखाच भारतीय गेम FAU-G ची घोषणा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं केली होती. तेव्हापासूनच तरुण या गेमची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अखेर प्रजासत्ताक दिनी हा गेम लॉन्च करण्यात आला. आधी अँड्रॉईड युजर्ससाठी हा गेम लॉन्च करण्यात आला होता. परंतु, आता आयफोन युजर्सनाही हा गेम खेळता येणार आहे. फियरलेस आणि युनायटेड गार्ड्स यांनी तयार केलेला FAU-G गेम पबजी प्रमाणेच बॅटल गेम आहे. मुळची बंगळुरुतील असलेल्या  nCore गेम्स कंपनीने हा गेम तयार केला आहे. अभिनेता अक्षय कुमारने मेड-इन-इंडिया FAU-G गेम लॉन्च होणार असल्याची घोषणा पबजी गेमवर बंदी आणल्यानंतर केली होती. 


PUBGहून वेगळा आहे FAU-G


FAU-G गेमची PUBG शी तुलना करण्याबाबत कंपनीने सांगितलं की, हा गेम पबजीहून वेगळा आहे. FAU-G मल्टीमोड शिवाय लॉन्च करण्यात आला आहे. तर PUBG मध्ये मल्टीप्लेयर मोड देण्यात आला होता. या दोन्ही गेम्समध्ये फरक आहे. याव्यतिरिक्त ग्राफिक्समध्येही FAU-G गेम PUBG ला मागे टाकतो. FAU-G गेमची साइज 500MB आहे. FAU-G गेम हिंदी भाषेत लॉन्च करण्यात आला आहे. तर पबजी इंग्रजीत होता. 


कमाईतील काही वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान करणार


अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटलं होतं की, "पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक गार्ड्स - फौजी. मनोरंजनातून खेळाडूंना आपल्या सैनिकांचा त्याग समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा 20 टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आला रे आला! PUB-G ला टक्कर द्यायला FAU-G आला; अक्षय कुमारकडून व्हिडीओ ट्वीट