iPhone 14 Production in India : आयफोन (iPhone 14) चं उत्पादन आता भारतात होणार आहे. ॲपल (Apple) कंपनीने याबाबत मोठी घोषणा केली आहे. iPhone 14 चं उत्पादन चेन्नईमधील स्थित फॉक्सकॉनकडून करण्यात येणार आहे. फॉक्सकॉन Apple कंपनीचा भारतातील पार्टनर आहे. चेन्नईमधील प्लांटमध्ये आयफोन iPhone 14 चं उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. Apple कंपनीने सांगितलं आहे की, ॲपल कंपनी आपलं नवीन उत्पादन iPhone 14 भारतात तयार करेल.' अलिकडच्या काळातच Apple कंपनीने त्यांचे चीनमधील उत्पादन प्लांट बंद केले होते. त्यानंतर Apple कंपनीने भारतात iPhone 14 चं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. भारतात उत्पादन केलेल्या  iPhone 14 ची निर्यातही करण्यात येईल.


Apple कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीलाच नवीन आयफोन 14 (iPhone 14) लाँच केला आहे. ग्राहक गेल्या अनेक महिन्यांपासून या फोनची वाट पाहत होते. सध्या तरुणामध्ये Apple ची क्रेझ वाढताना दिसत आहे. Apple कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'नवीन iPhone 14 नवीन तंत्रज्ञान आणि क्षमतांचं उत्तम उदाहरण आहे. आम्ही भारतात iPhone 14 चे उत्पादन करण्यास उत्सुक आहोत.'


भारतात 2017 पासून आयफोन उत्पादनाला सुरुवात


भारतात 2017 पासून आयफोन उत्पादनाला सुरुवात झाली. सर्वात आधी भारतात 2017 साली आयफोन एसई (iPhone SE) चं उत्पादन करण्यात आलं. त्यानंतर अनेक आयफोनचं भारतात उत्पादन करण्यात आलं. आता iPhone चं प्रोडक्शन चेन्नईमध्ये होणार आहे. सध्या भारतात आतापर्यंत  iPhone SE, iPhone 12, iPhone 13 या iPhones चं उत्पादन सुरु होतं. आता यामध्ये iPhone 14 ही समाविष्ट झाला आहे. भारतात उत्पादन केलेल्या  iPhone 14 ची निर्यातही करण्यात येईल.


प्रत्येक तिसरा आयफोन 'मेड इन इंडिया' असेल'


काही दिवसांपूर्वी, जेपी मॉर्गन संस्थेच्या एका अहवालानुसार, पुढील तीन वर्षांत भारतात आयफोनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. 2025 वर्षापर्यंत भारतात विकला जाणारा प्रत्येक तिसरा आयफोन 'मेड इन इंडिया' असेल. Apple ने 2017 मध्ये विस्ट्रॉन कंपनीसोबत पार्टनरशीप अंतर्गत भारतात पहिल्यांदा आयफोनची निर्मिती केली होती आणि नंतर फॉक्सकॉन देखील भारतात आयफोन निर्मिती करणार आहे. 


चीन देशाबाहेर आयफोनचं उत्पादन वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न


Apple कंपनीने चीन देशाबाहेर आयफोनचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर Apple कंपनीने गेल्या काही काळात चीनमधील आयफोन प्रोडक्शन प्लांट बंद केले आहेत. आयफोन 14 च्या उत्पादनासाठी Apple कंपनीने भारताची निवड केली आहे. याशिवाय येत्या काळात Apple कंपनी Mac, iPad, Apple Watch आणि AirPods चं प्रोडक्शनही चीन बाहेर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. Apple कंपनीने चीन देशाबाहेर 25 टक्के उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.