Apple Launch Event 2021 : अमेरिकन टेक जाएंट Apple आपला यावर्षीचा दुसरा इव्हेंट आज पार पडणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपला नवा 14 आणि 16 इंचाचा MacBook Pro मॉडल लॉन्च करणार आहे. याव्यतिरिक्त कंपनी नवे AirPods लॉन्च करण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जात आहे की, यामध्ये रीडिझाइन करण्यात आलेले मॅक-मिनीही आज लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीचा हा इव्हेंच वर्च्युअल असणार आहे. जाणून घेऊया, अॅपलच्या मोस्ट अवेटेड इव्हेंटबाबत सर्वकाही...


कुठे आणि कधी पाहू शकता इव्हेंट? 


Apple ने या इव्हेंटला 'Unleashed' असं नाव दिलं आहे. वर्च्युअली होणारा हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार, दुपारी एक वाजता सुरु करण्यात येणार आहे. या इव्हेंटची लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईट आणि ऑफिशिअल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहू शकता. 



14 आणि 16 इंचाचा MacBook Pro मॉडल लॉन्च होणार 


या इव्हेंटमध्ये Apple आपला नवा 14 आणि 16 इंचाचा मॅकबुक प्रो मॉडल लॉन्च करणार आहे. असं म्हटलं जातं की, कंपनी एका मॅक मिनीवर काम करत आहे. ज्यामध्ये M1X मॅकबुक प्रोच्या समान 64GB रॅम, 10-कोर CPU आणि 16 या 32 ग्राफिक्स कोर आहे. यामध्ये लीकर जॉन प्रॉसेरनं सांगितलं आहे की, अॅपलचा एम1एक्स-पावर्ड मॅक मिनीही नव्या पिढीतील टेक्नॉलॉजी डिझाइन सादर करणार आहे. 


नव्या AirPods वरुन उठणार पडदा 


Apple च्या आजच्या इव्हेंटमध्ये नवे AirPods 3 लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. हे कंपनीचे ट्रू वायरलेस ईयरबड्स सोबत थर्ड जनरेशन एअरपॉड्स असणार आहेत. या AirPods चं डिझाइन AirPods Pro प्रमाणे असू शकतं. एवढंच नाहीतर, एअरपॉड्सची केसही नव्या लूकमध्ये सादर केली जाऊ शकते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :