Apple iPhone SE 3 2022 : Apple iPhone SE 3 2022 हे Apple च्या आज महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असण्याची शक्यता आहे. ऍपल आपला 'पीक परफॉर्मन्स' ऑनलाईन इव्हेंट होस्ट करण्यासाठी सज्ज आहे. 2022 या वर्षातील हा कंपनीचा पहिला लॉन्च इव्हेंट असणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन असणार आहे. अॅपल पार्क, क्युपर्टिनो येथून थेट लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पुढील पिढीच्या iPhone SE व्यतिरिक्त, Apple ने नवीन iPad Air, Mac आणि iOS 15.4 लाँच केल्याचे रिपोर्ट्स आहेत. हा लॉन्च इव्हेंट सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता) होईल. हा कार्यक्रम Apple च्या वेबसाईट, त्यांच्या अधिकृत YouTube चॅनेल आणि iPhone, iPad, Mac आणि Apple TV वरील Apple TV अॅपद्वारे थेट-प्रवाहित केला जाईल. या इव्हेंटचं थेट प्रक्षेपण तुम्हाला कुठे पाहता येईल ते जाणून घ्या. 


रिपोर्ट्सनुसार, Apple iPhone SE 3 Apple हे इव्हेंटचे मुख्य आकर्षण असल्याचे बोलले जात आहे. Apple iPhone SE स्मार्टफोनमध्ये SE म्हणजे स्पेशल एडिशन आहे. पहिला iPhone SE मॉडेल कंपनीने मार्च 2016 मध्ये लॉन्च केला होता. हे डिव्हाईस त्याच्या पूर्वीच्या फ्लॅगशिप मॉडेलची परवडणारी टोन्ड-डाउन व्हर्जन म्हणून लॉन्च करण्यात आले होते.


पुढच्या पिढीच्या iPhone SE मॉडेलबद्दल गेल्या काही काळापासून बातम्या येत आहेत. जरी टेक जायंटने अधिकृतपणे डिव्हाईसबद्दल कोणतेही तपशील सांगितले नसले तरी, साधारण iPhone SE 3 मॉडेल कसं असू शकतं याचा अहवालानुसार अंदाज लावण्यात आला आहे. 


रिपोर्ट्स असेही सुचवतात की स्मार्टफोनमध्ये तीन स्टोरेज पर्याय असतील - 64GB, 128GB आणि 256GB तर डिस्प्ले सिंगल रियर कॅमेरासह कॉम्पॅक्ट 4.7-इंचाचा असण्याची शक्यता आहे. इतर फीचर्समध्ये चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट, होल-पंच कटआउटच्या आत सिंगल सेल्फी कॅमेरा, फेस आयडी नाही, होम बटण आणि अधिक वायरलेस चार्जिंग सपोर्ट यांचा समावेश असू शकतो. नुकत्याच आलेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की iPhone SE 3 ची किंमत जवळपास $300 असू शकते.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha