iPhone 12 series : Apple ने आपल्या Hi Speed इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरिज लॉन्च केली आहे. Apple ने आपल्या या इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरिजचे चार फोन लॉन्च केले आहेत. या इव्हेंटमध्ये अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी आयफोन 12 सीरिज सर्वात पॉवरफुल सीरिज असल्याचं सांगितलं आहे. आयफोन 12 सीरिजमधील सर्व फोन्समध्ये 5G सपोर्ट मिळणार आहे. अॅपलने इव्हेंटमध्ये चार आयफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro max या आयफोनचा समावेश आहे. जाणून घेऊया या फोनसंदर्भातील पाच खास गोष्टी...


iPhone 12 series च्या खास गोष्टी :


1. iPhone 12 series सहा कलर व्हेरियंट्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे. iPhone 12 च्या डिस्प्लेसोबत एचडीआर 10 सपोर्ट मिळणार आहे. वायरलेस चार्जिंग आणि ड्युअल सिम सपोर्टही देण्यात आला आहे. फोनमध्ये दुसरा सिम-ई-सिम असणार आहे. ए-14 बायोनिक प्रोसेसर iPhone 12 मध्ये युजर्सना मिळणार आहे.


2. iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max चार स्टेनलेस स्टील फिनिशमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये ग्रेफाइट, सिल्वर, गोल्ड आणि पॅशनेट ब्लू यांचा समावेश आहे.


3. iPhone 12 सोबतच 50 वॉटपर्यंत वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. उत्तम चार्जिंगसाठी आयफोन 12 मध्ये मॅगसेफ टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे, आयफोन 12 आणि अॅपल वॉच चार्ज एकाच चार्जरने चार्ज करणं शक्य आहे.


4. iPhone 12 च्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाईड मोड, नाइट मोडचे फिचर्स देण्यात आले आहेत. आयफोन 12 च्या सर्वच मॉडल्समध्ये देण्यात येणार आहेत. नाईट मोडमध्येही टाईम लॅप्स मिळणार आहेत.


5. iPhone 12 Pro मॉडलला 30 मिनिटांपर्यंत 6 मीटरपर्यंत पाण्यात ठेवता येऊ शकतं. iPhone प्रीमियम सामग्रीसोबत डिझाइन करण्यात आलं आहे. iPhone 12 Pro मॉडल एक नव्या डिझानचा दावा करत आहे. ज्यामध्ये एक सटीक सर्जिकल मॅट ग्लाससोबत एक भव्य सर्जिकल-ग्रेड स्टेनलेस स्टील बँड जोडण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Apple Event 2020: अॅपलकड़ून iPhone-12 सीरिजचे चारही फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत