Apple Event 2020: अॅपलकड़ून iPhone-12 सीरिजचे चारही फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार कार्यक्रम. Hi Speed या थीमवर आधारित कार्यक्रमात 5G मोबाईलचे लॉंच होणार
आयफोन 12 पाच रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आयफोन 12 चा डिस्प्लेसोबत एचडीआर 10 चा सपोर्ट मिळेल. वायरलेस चार्जिंग आणि ड्युअल सिम सपोर्ट करणार. फोनमधील दुसरं सिम ई-सिम असेल. फोनमध्ये ए -14 बायोनिक प्रोसेसर उपलब्ध असेल.
आयफोन 12 लॉन्च करण्यात आला. टिम कुक यांनी म्हटलं की, आयफोन 12 सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. आयफोन 12 मध्ये 5 जी सपोर्ट मिळेल. आयफोनची 5 जी स्पीड 4 जीबीपीएस असेल.
पार्श्वभूमी
मुंबई : जगभरात उत्सुकता लागून राहिलेल्या Apple च्या आजच्या वार्षिक लॉंच कार्यक्रमात iPhone 12 सीरिजचे लॉंच होणार आहे. या सीरिजला हाय स्पीडच्या टॅग लाईनवसह बाजारात आणले गेले आहे. हा लॉन्चिंग कार्यक्रम भारतीय वेळेप्रमाणे रात्री 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे.
कंपनीच्या या कार्यक्रमाव्यतिरिक्त फोनच्या किंमती किंवा इतर फीचर्सबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही . पण कंपनीच्या या वार्षिक लॉन्चिंग कार्यक्रमाबद्दल अनेक अफवा, अंदाज किंवा माहितीच्या लीकची चर्चा असते. त्यावरुन त्याचे फीचर्स आणि किंमतीची माहिती सांगता येऊ शकते.
Apple सीरिजमधील आयफोनच्या नव्या मॉडेलची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. Apple आज आपल्या बहुप्रतीक्षित असलेल्या आयफोन 12 (iPhone 12) आज बाजारात येत आहे. त्यासाठी एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या दरम्यान कंपनी त्यांच्या सर्वात छोटा आयफोन iPhone 12 mini यासंबंधीही घोषणा करण्याची शक्यता आहे.
4 मॉडेल लॉंच होणार
Apple त्यांच्या कार्यक्रमात iPhone 12 सीरिजमधील चार स्मार्टफोनचे लॉन्च करणार आहे. यात iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. या सर्व डिव्हाईसमध्ये 5G ची सेवा असणार आहे.
अशा असतील याच्या किंमती!
एका वृत्तानुसार iPhone 12 mini च्या डिस्प्लेचा आकार हा 5.1 इंच इतका असेल आणि याची किंमत 51 हजार इतकी असू शकते. 6.1 इंच डिस्प्ले असणाऱ्या iPhone 12 ची किंमत जवळपास 58 हजार 300 इतकी असेल. या दोन्ही स्मार्ट फोनमध्ये ड्युएल कॅमेराची सोय आहे. तसेच यात 64GB पासून 256GB स्टोरेजची व्यवस्था असण्याची शक्यता आहे.
iPhone 12 Pro चा डिस्प्ले हा 6.1 इंच इतक्या आकाराचा असू शकतो तर त्याची किंमत ही 73 हजार असू शकते. iPhone 12 Pro Max चा डिस्प्ले 6.7 इंच असेल आणि त्याची सुरुवातीची किंमत ही 80 हजार इतकी असू शकेल. या कार्यक्रमात कंपनी MagSafe हा वायरलेस चार्जर देखील बाजारात आणू शकते. वरील किंमती या केवळ अंदाजे आहेत. कंपनीने अधिकृतरित्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केला नाही.
असे असेल त्याचे डिजाईन
एका अहवालात असे सांगण्यात आले आहे की, iPhone 12 चे डिझाईन iPhone 4 शी मिळते जुळते आहे. कंपनीने हे मॉडेल 2010 साली लॉन्च केले होते. नवा आयफोन हा फ्लॅट एज असू शकतो तसेच त्याला स्टेनलेस स्टीलची चौकट देखील असू शकते.
पहिला 5G iPhone असेल
सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे 5G मोबाईल उपलब्ध आहेत. Apple ची iPhone 12 सीरिज ही पहिली 5G सीरिज असेल. कंपनीचे विश्लेषक मिंग-ची कूओ यांच्या मते सर्व चारही आयफोन 5G असतील.
[mb]1597389106[/mb]
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -