Apple AirPods Max : अॅपलने 'एअरपॉड्स मॅक्स' नावाने आपला नवा वायरलेस हेडफोन लॉन्च केला आहे. 'एअरपॉड्स मॅक्स'चं डिझाइन आकर्षक आणि सुंदर आहे. यामध्ये एच1 चिप्स आणि एडेप्टिव ईक्यू, अॅक्टिव नॉइज कॅन्सेलेशन, ट्रान्सपरन्सी मोड आणि स्पाशिअल ऑडियोसोबत कॉम्प्युटेशनल ऑडियोचा एडवांन्स सॉफ्टवेअर आहे. 'एअरपॉड्स मॅक्स' स्पेस ग्रे, सिल्वर, स्काय ब्ल्यू, ग्रीन आणि पिंकसह पाच सुंदर कलर्समध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.


डिझाइनबाबत बोलायचे तर 'एअरपॉड्स मॅक्स'मध्ये नीट मेळ कॅनोपी आहे आणि स्टेनले स्टील हेडबँड देण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या हेड शेपनुसार स्टील हेडबँड अॅडजस्ट करता येऊ शकतात. भारतात 'एअरपॉड्स मॅक्स'ची किंमत 59,900 रुपये आहे. हा 15 डिसेंबरपासून ऑनलाईन किंवा अॅप्पल स्टोरमधून खरेदी करु शकता. दरम्यान, अमेरिकेत 'एअरपॉड्स मॅक्स' आजपासून खरेदी करता येणार आहे.



अॅप्पल वॉचपासून प्रेरणा घेऊन डिजिटल क्राउन


'एअरपॉड्स मॅक्स'मध्ये डिजिटल क्राउन देण्यात आलं आहे. जे अॅप्पल वॉचशी प्रेरित आहेत. या क्राउनमुळे युजर्स वॉल्यूम कंट्रोल करु शकतात. या क्राउनमुळे प्ले या पॉजही करता येणार आहे. त्याचसोबत यामुळे ऑडियो ट्रॅक्स स्किप करता येणार आहेत. यामुळे तुम्ही फोनचं उत्तर देऊ शकणार आहेत. तसेच फोनही कट करता येणार आहे.



20 तासांचा बॅटरी बॅकअप


'एअरपॉड्स मॅक्स'च्या बॅटरी आणि परफॉर्मंसबाबत बोलायचं झालं तर याची बॅटरी लाइफ 20 तास चालू शकते. तसेच 20 तास तुम्ही ऑडियो ऐकू शकता, बोलू शकता किंवा प्लेबॅक फिल्म्स अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सिलेशन आणि स्पेशिएल ऑडियो एनेवल्ड करु शकता. 'एअरपॉड्स मॅक्स' एक सॉफ्ट, स्लिम स्मार्ट केससोबत येतो. ज्यामुळे 'एअरपॉड्स मॅक्स'ला एक अल्ट्रा पॉवर स्टेटमध्ये टाकतं, ज्यामुळे 'एअरपॉड्स मॅक्स' उपयोग करत नसताना बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मदत करतं.


महत्त्वाच्या बातम्या :