Amazon on OnePlus 10 Pro 5G : नवीन टेक्नॉलॉजीच्या स्मार्टफोनमधील एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे Alexa. यामध्ये फक्त अ‍ॅप डाऊनलोड करा आणि त्यानंतर तुमचा स्मार्टफोन फक्त व्हॉईस कमांडने चालू शकेल अशी ही टेक्नॉलॉजी आहे. OnePlus 10 Pro 5G हा Amazon Alexa वरील स्मार्टफोनमध्ये तयार केलेला सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. सध्या सेलमध्ये या स्मार्टफोनवर 25 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर आहे.




OnePlus 10 Pro 5G (volcanic Black, 12GB RAM, 256GB storage)



  • OnePlus च्या या 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 71,999 आहे. हा स्मार्टफोन SBI कार्डने खरेदी केल्यास 4,500 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक आहे आणि स्मार्टफोनवर 19,050 रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील आहे.

  • 8GB RAM व्हेरिएंटची किंमत 66,999 आहे. SBI कार्डने स्मार्टफोन विकत घेतल्यास 4500 रूपयांचा फ्लॅट कॅशबॅक आणि 19,050 रूपयांचा एक्सचेंज बोनसदेखील आहे.





OnePlus 10 Pro 5G चे फीचर्स :



  • हा स्मार्टफोन तुम्हाला ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये मिळू शकतो. यामध्ये अलेक्साची सुविधा आहे. ज्यामुळे तुम्ही हँड्स फ्री कमांडसह स्मार्टफोन ऑपरेट करू शकता. तसेच, या स्मार्टफोनमध्ये सर्वोत्तम कुलिंग सिस्टम आहे. विशेष म्हणजे तुम्ही या स्मार्टफोनचा वापर अधिक जरी केला तरी हा स्मार्टफोन गरम होणार नाही. 

  • या स्मार्टफोनचा कॅमेरा शानदार आहे. हे कॅमेरे बनवणाऱ्या प्रसिद्ध कंपनी हॅसलब्लॅडने बनवले आहे. 48 MP मुख्य कॅमेरा, 50 MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. यात 1/1.56" आकाराचे सेन्सर आहेत. तसेच 8 एमपी टेलीपोटो लेन्स देण्यात आल्या आहेत. 2 MP मोनोक्रोम कॅमेरा आणि 32 MP सेल्फी कॅमेरादेखील आहे. 

  • या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 जनरेशन चिपसेट प्रोसेसर आहे. फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह स्मार्टफोनचा स्क्रीन आकार 6.7 इंच आहे आणि त्यात नवीन LTPO टेक्नॉलॉजी आहे.

  • Android 11 आधारित ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टम आणि 80W वार्प चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी. 50W ची वायरलेस चार्जिंग क्षमता देखील आहे. हा स्मार्टफोन अवघ्या 15 मिनिटांत चार्ज होतो.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha