ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये स्मार्टफोन, फ्रिज आणि स्मार्ट टीव्ही यांची विक्री सुरु झाली आहे. याशिवाय या दोन्ही झोनमध्ये किरकोळ दुकानं देखील चालू होणार आहेत. सरकारच्या नियमावलीनुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या होम डिलिव्हरीला देखील सरुवात होणार आहे. या दोन्ही झोमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत विक्री सुरु राहणार आहे.
वाचा : Lockdown-3 | तुमचं शहर कोणत्या झोनमध्ये? लॉकडाऊन शिथील होणार की नाही? जाणून घ्या
भारत सरकारच्या नियमावलीनुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये किरकोळ दुकानं चालू होणार आहे. ज्यात स्मार्टफोन विक्री करणाऱ्या दुकानांचा देखील समावेश आहे. म्हणजेच नागरिक आता स्मार्टफोनची खरेदी करु शकणार आहे. पण ज्या भागात रेड झोन घोषित आहे अशा ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता इतर वस्तूंची डिलिव्हरी होणार नाही.
भारत सरकारनुसार रेड झोनमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळुरु आणि अहमदाबाद सारख्या शहरांचा समावेश आहे. या शहरांत कोरोनाचा वाढता प्रभाव दिसून आला आहे. देशात या शहरांमध्ये अत्यावश्यक वस्तूंची डिलीवरी करण्यात येणार नाही. भारत सरकारच्या या निर्णयाने ई-कॉमर्स कंपनींच्या विक्रीत 60 टक्कयांनी वाढ होणार आहे.
देशात सलग तिसरा लॉकडाऊन
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली होती. हा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी 3 मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 मे पासून 17 मे पर्यंत राहणार आहे.
Corona Zones | राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काय सुरू होणार आणि काय बंद राहील? पाहा व्हिडीओ