नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अली बाबाचं UC मोबाईल ब्राऊजर वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण ब्राऊजर ग्राहकांचं लोकेशन आणि डेटा रिमोट सर्व्हरमध्ये कसा पाठवतो, याची माहिती घेण्यासाठी सरकारने कंपनीची चौकशी सुरु केली आहे.
‘बिझनेस स्टँडर्ड’ने याबाबत वृत्त दिलं आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच जवळपास सर्वच चिनी मोबाईल कंपन्यांची डेटा सिक्युरिटी प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. मंत्रालयाने 28 कंपन्यांकडून 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागवलं आहे.
UC ब्राऊजरकडून युझर आणि मोबाईलची माहिती चीनमध्ये असलेल्या रिमोट सर्व्हरला पाठवली जाते, असं 'बिझनेस स्टँडर्ड'ने सुत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. या माहितीमध्ये IMSI (इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्राईबर आयडेंटिटी) आणि IMEI (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) यांचा समावेश आहे.
वायफायच्या माध्यमातून इंटरनेट वापरल्यास फोन आणि अक्सेस पॉईंटची माहितीही रिमोट सर्व्हरला पाठवली जाते, असं सुत्रांचं म्हणणं आहे. स्टेट काऊंटरच्या ताज्या आकडेवारीनुसार या मोबाईल ब्राऊजरमध्ये UC चा शेअर 50 टक्के आहे.
दरम्यान यापूर्वीही यूनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमध्येही या ब्राऊजरमध्ये सुरक्षात्मक दोष आढळले होते. चिनी मोबाईल कंपन्या भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला पाठवत असल्याचा आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. त्यातच हा प्रकार समोर आल्याने आता UC ब्राऊजर वापरायचं का, असा प्रश्न युझर्सच्या मनात निर्माण झाला आहे.
UC ब्राऊजरवर चीनला भारतीय ग्राहकांचा डेटा विकल्याचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2017 10:30 PM (IST)
ब्राऊजर ग्राहकांचं लोकेशन आणि डेटा रिमोट सर्व्हरमध्ये कसा पाठवतो, याची माहिती घेण्यासाठी सरकारने कंपनीची चौकशी सुरु केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -