मुंबई : रिलायन्सच्या 4G VoLTE फीचर फोन लवकरच ग्राहकांचा हातात येणार आहे. यासाठी 24 ऑगस्टपासून प्री-बुकींग सुरु होणार आहे. पण हा फोन फक्त ऑनलाईन मिळणार असल्याचं समजतं आहे.


कंपनीतील काही खास सुत्रांच्या मते, जिओ फोनची विक्री फक्त ऑनलाईनच केली जाईल. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करावी लागणार आहे. म्हणजेट ऑफलाईन स्टोअरवर हा फोन मिळणार नाही. कंपनी ऑर्डरनुसार या फोनची होम डिलिव्हरी देईल.

पण तुम्ही या फीचर फोनचं बुकींग घरबसल्याही करु शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे.

तुमचा जिओ फोन बुक करण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन टाइप करा JP< तुमचा परिसराचा पिनकोड< तुमच्या जवळच्या जिओ स्टोरचं कोड टाकून हा मेसेज 702 11 702 11 नंबरवर सेंड करा.

या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला रिलायन्स जिओकडून thank you असा मेसेज येईल.