मुंबई : गेमिंगमध्ये प्रत्येकवेळी शक्तीशाली प्रोसेसर, एक ग्राफिक्स कार्ड किंवा एक हाय-एंडकंसोल असणं आवश्यक नाही. गेमिंगचं भविष्य खरंतर क्लाउड आहे. भारतातील आघाडीचे गेमर्स माम्बा (सलमान अहमद) आणि मॉर्टल (नमन माथुर) यांनी लाईव्ह एअरटेल 5G टेस्ट नेटवर्कसोबत भारतातील पहिल्या क्लाउड गेमिंग इव्हेंटचा अनुभव घेतला.
एअरटेलकडून पहिला डेमो सेशन मानेसरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, या अनुभवानं गेमर्सही थक्क झाले. आपला स्मार्टफोनसोबत 3500 मेगाहर्ट्झ उच्च क्षमतेच्या स्पेक्ट्रम बँडसोबत जोडलेल्या दोन्ही गेमर्सनी 1 जीबीपीएसहून अधिक स्पीडचा अनुभव घेतला. त्यांनी मिड-सेगमेंट स्मार्टफोनचा वापरही केला आणि हे दाखवून दिलं की, कोणत्याही स्मार्टफोनमध्ये 5 वापरणारा व्यक्ती गेमिंगचा मनमुराद आनंद घेऊ शकतो.
त्यांचं म्हणणं आहे की, हायएंड पीसी आणि कंसोल क्वालिटीसह गेमिंग करण्याचा जो अनुभव येतो. तोच अनुभव स्मार्टफोनवरही गेम खेळताना आला. 5G कनेक्टिव्हिटीची शक्यता भारतात ऑनलाईन गेमिंगला अनलॉक करु शकते. यामुळे छोट्या शहरांतील गेमर्सना मुख्य प्रवाहात आणण्याचा रस्ता आहे. 5G भारतातत गेमिंगचं विश्व एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतं. तसेच भारतात गेम तयार करणं आणि ते लॉन्च करण्याची संधी देऊ शकतं.
गेम डेव्हलपर्ससाठी नवे रस्ते खुले करण्यासोबतच गेमर्सना एक वेगळी ओळख मिळण्यासाठी मदत होईल. योग्य गेमिंग इंफ्रास्ट्रक्चरसह, ज्या देशांमध्ये गेमिंगला खेळाच्या रुपात स्विकारण्यात आलं आहे. त्या देशांसह भारतही आपली वेगळी ओळख तयार करु शकतो.
क्लाउड गेमिंग हे समग्र गेमिंग ला कसे बदलू शकते?
आजच्या काळात गेमिंग हे बहुधा डिव्हाईसच्या हार्डवेअरवर निर्भर असतं. म्हणजेच, प्रोसेसर, डिस्प्ले, ग्राफिक्स, रॅम इत्यादी. उदाहर्णार्थ, जर तुम्हाला विशेष गेम खेळण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी हे पडताळून पाहावं लागेल की, तो गेम खेळण्यासाठी तुमचा फोन सक्षम आहे की नाही. तसेच फोन जेवढा सक्षम असेल, तेवढीच त्याची किंमत ही जास्त असण्याची शक्यता आहे. हे सर्व वास्तविक हार्ड-एंड गेमिंगच्या काही दर्शकांपर्यंत सिमीत ठेवले जाते. उदा. जे महागड्या हार्डवेअरमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजेच, क्लाउड गेमिंगची आवडही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. खरोखरच, ही गोष्ट गेमिंगला एक स्ट्रिमिंग अनुभव बनवते. जसं की, आपण आपल्या डिव्हाईसवर एक व्हिडिओ स्ट्रिम करतो, तसंच आपण गेम डाउनलोड केल्याशिवाय फोनवर पूर्ण एक गेम खेळू शकतो. तो गेम क्लाउडमध्ये सर्वरवर चालतो.
स्मार्टफोनमधील सुपर-फास्ट एअरटेल 5G नेटवर्क सोबत तुम्हाला हजारो गेम्स हे क्लाउडशी कनेक्ट करून खेळता येणार आहेत. यासोबतच फक्त काही क्लिकसह तुम्ही हजारो गेमपर्यंत पोहोचू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चित्रपट किंवा टीव्ही शो स्ट्रीम करण्यासोबतच इथे तुम्ही केवळ कंटेंट पाहाता. इथे तुम्ही गेमसोबत संवाद साधता, म्हणजेच, कमांड देणं इतर गेमर्ससोबत संवाद साधणं इत्यादी. यामुळे एअरटेलच्या हायपर-फास्ट आणि अल्ट्रा-लो लेटेंन्सी 5G नेटवर्कमध्ये उत्तम अनुभव मिळेल.
भारतीय एअरटेलचे सीईओ, रणदीप सेखों यांनी म्हटलं आहे की, "क्लाउड गेमिंग 5G ची हाय स्पीड आणि लो लेटेंसी यांच्या संयोगातून सर्वात मोठ्या उपयोगी पडणाऱ्या परिक्षण नेटवर्कवर भारताचं पहिल्या 5G डेमो दिल्यानंतर, आम्ही या 5G गेमिंग सत्राचं संचलन करण्यासाठी उत्सुक आहोत. जगाच्या दुसऱ्या टोकावर राहणारी एखादी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीसोबत चालता-बोलता रिअल टाईम गेमिंगचा आनंद घेतेय, अशी कल्पना करा. ही एक रोमांचक डिजिटल भविष्याची सुरुवात आहे. जी एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी सक्षमपणे उभी करत आहे. कारण आम्ही भारतात 5G नेटवर्क सुरु करण्याची तयारी करतोय."
एअरटेलच्या 5G गेमिंग इव्हेंट कंपनीद्वारे यावर्षीच्या सुरुवातीला हैदराबादमध्ये आयोजित आणखी एका यशस्वी लाईव्ह प्रदर्शनात 4G नेटवर्कवर 5G नेटवर्कचं परीक्षण करण्यात आलं. एअरटेलने काही दिवसांपूर्वीच भारतातील अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्कचं परीक्षण करण्यासाठी Nokia आणि Ericsson सोबत भागीदारी केली आहे. भारतातील अग्रणी मोबाईल नेटवर्कच्या रुपात एअरटेल मोठ्या पडद्यावर 5G चं परीक्षण करत आहे. ज्यामुळे देशात 5G नेटवर्च्या आगमनाचा मार्ग सोपा होईल आणि कनेक्टिव्हिटीच्या जगात व्या दुनियेचा पायारचता येईल.