Electric Vehicle: देशात आणि जगात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळे अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक कार बाजारात आणत आहेत. कार निर्मात्यांव्यतिरिक्त आता काही टेक कंपन्याही इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये उतरण्याच्या विचारात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चीनची लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी शाओमी देखील इलेक्ट्रिक वाहने बनवणार आहे.


ग्रेट वॉलसह हात मिळवणी


माध्यमांच्या वृत्तानुसार, शाओमीने इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी ग्रेट वॉलशी हातमिळवणी केली आहे. कंपनी आपले इलेक्ट्रिक वाहन ग्रेट वॉल प्लांटमध्ये बनवणार आहे. दोन्ही कंपन्या पुढील आठवड्यात याची घोषणा करू शकतात.


Elon Musk : टेस्ला कार बिटकॉईनने खरेदी करता येणार, इलॉन मस्क यांची घोषणा


ग्रेट वॉलने यापूर्वी कोणत्याही कंपनीसोबत एकत्र येऊन वाहने तयार केलेली नाहीत. शाओमीचा हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी ग्रेट वॉल कंपनी इंजिनीअरिंग मदत करेल. शाओमी आपले इलेक्ट्रिक वाहन मोठ्या बाजारात आणण्याची योजना आखत आहे. मात्र ही वाहने बाजारात कधी येतील हे अद्याप समोर आलेलं नाही.


बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी विकसित करणारा मालामाल होणार, इलॉन मस्क यांच्याकडून तब्बल 700 कोटींचं बक्षीस जाहीर


शेअर्समध्ये  मोठी तेजी 


गेल्या शुक्रवारी शाओमीच्या शेअर्समध्ये 6.71 टक्के वाढ झाली. त्याचवेळी ग्रेट वॉल्सच्या हाँगकाँगच्या शेअर्समध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर शांघाईतील शेअर्समध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली.


Bitcoin: टेस्लाची बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक, बिटकॉइनची किंमत नव्या उंचीवर