टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या एका निर्णयाने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी आता निर्णय घेतला आहे की, ग्राहकांना टेस्लाची कार बिटकॉईन्स देऊनही खरेदी करता येऊ शकते. याची सुरूवातही झाली आहे. म्हणजेच, टेस्लाची कार बिटकॉईनने खरेदी करता येणार आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर पेमेंट ऑप्शनमध्ये डॉलरसह बिटकॉईनचा पर्यायही दिला आहे. 

Continues below advertisement

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिकेतील लोक आता बिटकॉईनसह टेस्ला कार खरेदी करू शकतात. क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहाराचा पर्याय या वर्षाच्या शेवटी इतर देशांतही उपलब्ध होईल. टेस्लाने यापूर्वीच बिटकॉईनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी विकसित करणारा मालामाल होणार, इलॉन मस्क यांच्याकडून तब्बल 700 कोटींचं बक्षीस जाहीर

Continues below advertisement

भारतीय रुपयात सांगायचे तर एका बिटकॉइनची किंमत 34 लाखांच्या जवळ पोहोचली आहे.कोरोनाच्या काळात बिटकॉइनच्या किंमतीत प्रचंड वाढ पहायला मिळाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीचा विचार करता बिटकॉइनच्या किंमतीत आता 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टेस्लाच्या या महाप्रचंड गुंतवणुकीनंतर बिटकॉइनच्या किंमतीमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.

Bitcoin: टेस्लाची बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक, बिटकॉइनची किंमत नव्या उंचीवर

मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, "तुम्ही आता बिटकॉईनसह टेस्ला खरेदी करू शकता. टेस्लाला दिलेला बिटकॉईन्सना बिटकॉईन्स म्हणून कायम ठेवलं जाईल, ज्यांना चलनात रूपांतरित केलं जाणार नाही. मस्क पुढे म्हणाले की, बिटकॉईनद्वारे व्यवहाराची सुविधा या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेबाहेरील अन्य देशांमध्येही उपलब्ध होईल.