5G Services Launch : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांच्या हस्ते 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला. इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात पंतप्रधानांनी या सेवेचा शुभारंभ केला. 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान प्रगती मैदान, दिल्ली येथे इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या देशातील निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, 2023 पर्यंत देशातील बहुतांश शहरांमध्ये ही सेवा सुरु होईल असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. पण तत्पूर्वी 5G म्हणजे काय? आणि 4G पेक्षा 5G सेवा कशी वेगळी आहे हे समजून घ्या.

  

5G सेवा म्हणजे काय?

5G चा सेवेचा संपूर्ण अर्थ म्हणजेच Fifth Generation असा आहे. ही एक नवीन जागतिक वायरलेस प्रणाली आहे. 5G चा इंटरनेट स्पीड 4G पेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. सध्या, 5G सेवा 2018 मध्ये USA आणि चीन, यूएसए, दक्षिण कोरिया, यूके, स्पेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, इटली, फ्रान्स, थायलंड आणि स्वीडनमध्ये उपलब्ध आहे. 5जी तीन बँड्समध्ये काम करते.  लो बँड, मिड आणि हाय फ्रीक्वेंसी बँड स्पेक्ट्रम.

4G VS 5G
100 MBPS इंटरनेट स्पीड 10 GBPS 
200 MBPS एरिया कव्हरेज  1 GBPS
25 MBPS  डाटा ट्रान्सफर स्पीड 400 MBPS
100 MBPS डाऊनलोड स्पीड 20 GBPS 
60-98 मिली सेकंद लेटसी स्पीड 5 मिली सेकंद हून कमी 
     

5G सुरू करण्याचे फायदे : 

  • 5G सेवा सुरू झाल्यानंतर ऑटोमेशनचे नवे पर्व सुरू होईल. म्हणजे ज्या गोष्टी आजवर मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित होत्या, त्या आता खेड्यापाड्यातही उपलब्ध होणार आहेत. 
  • 5G सेवा सुरू झाल्यानंतर देशात डिजिटल क्रांती होणार आहे. रोबोटिक्स टेक्नॉलॉजी विकसित होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. तसेच, ई-गव्हर्नन्सचा विस्तार होईल.
  • कोरोनानंतर ज्या प्रकारे लोकांचे इंटरनेटवरील अवलंबित्व वाढले आहे ते पाहता, 5G प्रत्येकाचे जीवन अधिक चांगले आणि सोपे बनविण्यात मदत करेल. 
  • 5G तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा, आभासी वास्तविकता, क्लाउड गेमिंगसाठी नवीन मार्ग उघडतील.
  • 5G नेटवर्कवरून 10 ते 20 सेकंदात 2 GB चित्रपट डाउनलोड केला जाईल. व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि कारखान्यांमध्ये रोबोट्स वापरणे सोपे होईल. 

महत्वाच्या बातम्या :