5G Benefits : दोन आठवड्यात आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत आणि यासोबतच आपलं इंटरनेट तंत्रज्ञानही 4G वरुन 5G होणार आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक क्रांतिकारी बदल होऊ शकतात. नुकत्याच झालेल्या 5G च्या चाचणीत मोठं यश मिळालं. यामध्ये अवघ्या तीस सेकंदात एक जीबीपर्यंतचा डेटा डाऊनलोड करता आला. यावरुनच तुम्ही 5G तंत्रज्ञान कसं असू शकतं, याचा अंदाज लावू शकतात. नव्वदच्या दशकात भारतामध्ये तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाले. सुरुवातीला 2 जी, त्यानंतर 3 जी आणि 4 जी तंत्रज्ञान आलं, ज्यानं संपूर्ण जग मोबाईलच्या माध्यमातून हातात आणून दिलं. आता यामध्ये आणखी अमुलाग्र बदल होत असून 4 G ला मागे टाकून नव्या वर्षात 5G तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात करणार आहोत. 5G तंत्रज्ञानामुळे इंटरनेट आणि मोबाईल वापरणाऱ्यांची आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. 


एअरटेलची यशस्वी टेस्टिंग -  
5G तंत्रज्ञानाच्या दिशेने भारत वेगाने वाटचाल करत आहे. भारतात 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी झाली आहे. आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने (Bharti Airtel) हैदराबादमध्ये 5G तंत्रक्षानाची यशस्वी चाचणी केली आहे. 5G तंत्रज्ञानाच्या चाचणीदरम्यान हैदराबादमध्ये 1 जीबी फाईल अवघ्या 30 सेकंदात डाऊनलोड झाली. अलीकडे, एअरटेलने नोकिया (Nokia) सोबत कोलकाता शहराबाहेर 700 MHz स्पेक्ट्रम बँडमध्ये पहिली 5G चाचणी यशस्वीपणे पार पाडली. भारतातील ग्रामीण भागात करण्यात आलेली ही पहिली 5G चाचणी होती. उद्योग जगताला नव्या उंचीवर नेहण्यासाठी भारतीय एअरटेलने ग्लोबल टेक्नोलॉजी आणि मॅन्युफॅकचरिंग कंपन्यासोबत मिळून 5G तंत्रज्ञानातील सर्व अडचणी दूर केल्यात. एअरटेलच्या उपक्रमाचा अनेक कंपन्याना फायदा होणार असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यासाठी एअरटेल कंपनी  Intel, Qualcomm, CISCO, Accenture,Erricson यासरख्या कंपन्यासोबत काम करत आहे, ज्यामुळे भारत लवकरच हायपरकनेक्टेड विश्वात जाईल. एअरटेलचा दावा आहे की भारतीय ग्राहकांना नव्या वर्षात 5G स्पीडचा अनुभव घेता येईल.


दहा पटीने इंटरनेट स्पीड - 
भारतात 5G तंत्रज्ञानाची सुरुवात झाल्यानंतर दहा पटीने इंटरनेटचा स्पीड जास्त वाढेल. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांचं आयुष्य बदलून जाईल. सध्या असलेल्या 4G इंटरनेटचा स्पीड इतका चांगलाय. विचार करा 5G तंत्रज्ञानात इंटरनेटचा स्पीड किती असेल. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 5G चा स्पीड हा 4G च्या तुलनेत दहा पटीने जास्त असेल. 5G तंत्रज्ञानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक रोजगार उपलब्ध होतील. ऑटोमेशन वाढेल. आतापर्यंत फक्त मोठ्या शहरांपर्यंत मर्यादीत असणाऱ्या गोष्टी गाव-खेड्यातही उपलब्ध होतील. ज्यामध्ये ई-मेडिसीन, शिक्षण या क्षेत्रांचा समावेश असेल. त्याशिवाय 5G तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होईल.  5G तंत्रज्ञानामुळे डिजिटल क्रांतीला नवी दिशा मिळणार आहे. त्याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स, उद्योग आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानातही मोठे बदल होणार आहेत. 5G तंत्रज्ञानामुळे नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. तसेच ई-गवर्नेंसचाही विस्तार होईल.  5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ई-कॉमर्स, आरोग्य केंद्र, दुकानदार, शाळा, महाविद्यलय, कॉलेज, इतकेच नाही तर शेतकरीही याचा फायदा घेतील.  कोरोना महामारीच्या काळात आपण सगळे जवळपास इंटरनेटवरच अवलंबून होतो, हे पाहाता आपण इंटरनेटवर खूप निर्भर असल्याचं दिसतेय. हे सर्व पाहाता 5G आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 5G तंत्रज्ञानामुळे  हेल्थकेअर, व्हर्चुअल रियालिटी, क्लाउड गेमिंग यासाठी नवीन रस्ते खुले होतील. तसेच विनाचालक गाडी सुरु होण्याच्या दिशेनेही पावले उचलली जातील.  


काय आहे 5G नेटवर्क?
पुढील काही दिवसांत इंटरनेटच्या पाचव्या पिढीची सुरुवात होणार आहे. हे 4G नेटवर्कच्या तुलनेत अधिक वेगवान आहे.  4जी नेटवर्कवर इंटरनेटवर सरासरी स्पीड 45 एमबीपीएस असते. पण 5जी नेटवर्कवर इंटरनेटचा स्पीड 1000 एमबीपीएसपर्यंत पोहचणार आहे. ज्यामुळे इंटरनेटचं विश्व पुर्णपणे बदलेल. म्हणजेच 4जीच्या तुलनेत 10 ते 20 पटीने वेगानं डेटा डाऊनलोड स्पीड मिळणार आहे. एक चित्रपट डाउलोड करण्यासाठी 4 जीमध्ये सात ते आठ मिनिटं लागतात, पण 5G मध्ये फक्त 20 सेकंदात तुम्ही चित्रपट डाऊनलोड करु शकता. सराकारद्वारा स्थापन केलेल्या एका कमिटीच्या रिपोर्ट्सनुसार, 5G मुळे 2035 पर्यंत भारतात एक लाख कोटी डॉलरचा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. एरिक्शनच्या रिपोर्ट्सनुसार, 5G मुळे भारत सरकारकडे 2026 पर्यंत 27 अरब डॉलरपेक्षा जास्त महसूल जमा होईल. एरिक्शनच्या अन्य एका रिपोर्ट्सनुसार, 2026 पर्यंत जगभरात 3.5 अरब 5जी कनेक्शन होतील, तर भारतात याची संख्या 35 कोटींपर्यंत असेल. 5G सेवा सुरू करण्यासाठी एअरटेल पूर्णपणे तयार आहे. इंटरनेट वापरकर्त्यांसाठी लवकरच 5G सेवा उपलब्ध होईल, त्यानंतर लोकांची जीवनशैली बदलेल.


कोणत्या क्षेत्रांना होणार फायदा?
वर्क फ्रॉम होम : 
कोरोनाकाळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 5G तंत्रज्ञान आल्यानंतर या सेवेचा विस्तार होईल. 


टेलिहेल्थ : 
5G च्या मदतीने रोगाचे निदान आणि उपचारात मोठी सुधारणा होईल. कृत्रिम तंत्रज्ञानाच्या आधारे रोबोटिक शस्त्रक्रिया करता येईल. 5G च्या आगमनाने टेलिमेडिसिनचा विस्तार होईल. ग्रामीण भागात व्हिडिओच्या माध्यमातून मोठमोठे डॉक्टर रुग्णांशी थेट संपर्क साधून त्यांच्यावर उपचार करू शकतील. तसेच 5G मुळे टेलीमेडिसिनचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. एका अभ्यासानुसार, टेलीमेडिसिन बाजारात 2017 पासून 2023 पर्यंत 16.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. पण, 5G आल्यासयामध्ये आणखी मोटी वाढ होण्याची शक्यता आहे. 


रिमोट कंट्रोल कार :
5G तंत्रज्ञान आल्यानंतर जिथे ड्रायव्हरलेस कार उपलब्ध होईल. तुम्हांला ड्रायव्हरलेस कारचा वापर करता येईल. तुम्हांला कोणत्याही ठिकाणी बसून चालकविरहित कार बुकही करता येईल.


स्मार्ट सिटी :
5G आल्यानंतर शहरे अधिक स्मार्ट होतील. 5G तंत्रज्ञान शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी, शहरे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.


क्लाउड-गेमिंग : 
Airtel ने 5G इंटरनेटवर देशातील पहिले क्लाउड-गेमिंग सत्र यशस्वीरित्या आयोजित केले आहे. क्लाउड गेमिंगचा. गेमर्सना यांचा खूप फायदा होईल. क्लाउड गेमिंगमुळे युजरला कोणत्याही गेमिंग हार्डवेअरमध्ये गुंतवणूक न करता रिअल-टाईममध्ये गेम खेळण्याचा आनंद घेता येईल.


मनोरंजन : 
4G आल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मचा जन्म कंटेंट प्रोवाईडर म्हणून झाला. लोक मल्टिप्लेक्स आणि सिनेमा हॉल सोडून​लोक घरी बसून OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटांपासून वेब सिरीज पाहू लागले. 5G आल्यानंतर फास्ट स्पीडमुळे मनोरंजन क्षेत्रात आणखी क्रांती होईल.


शिक्षण : 
कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षण मिळाले. 5G तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या आणि सोप्या पद्धतीने शिक्षण दिले जाऊ शकते.