corona cases Today : हिवाळ्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतोय. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. त्यातच कोरोनाचा जेएन.1 या नव्या विषाणूचेही रुग्ण वाढत आहेत.  जेएन.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. केरळमध्ये  जेएन.1 या नव्या सब व्हेरियंटचे 78 रुग्ण झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये 9 महिन्यानंतर कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झालाय. पश्चिम बंगाल आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णांचा मृत्यू झालाय. याआधी 26 मार्च 2023 रोजी पश्चिम बंगालमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला होता.


9 महिन्यानंतर पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे मृत्यू - 


तब्बल 9 महिन्यानंतर कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये मृत्यू झालाय. याआधी 26 मार्च 2023 रोजी कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये मृताची नोंद झाली आहे. अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला कोरोनाशिवाय इतरही आजार झाले होते. त्या रुग्णावर कोलकात्यामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. केंद्रीय आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, या रुग्णाचे स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेत. पश्चिम बंगालमध्ये सध्या कोरोनाचे 11 रुग्ण आहेत. गुरुवारी तीन जणांनी कोरोनावर मात केली. 


कर्नाटकमध्ये सर्वाधिक सक्रीय रुग्ण - 


मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 692 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या चार हजार 97 इतकी झाली आहे. देशभरात सर्वाघिक सक्रीय रुग्ण केरळमध्ये आहेत. मागील 24 तासात कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झालाय.  महाराष्ट्रात दोन रुग्णांचा मृत्यू झालाय. कर्नाटक, दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक एक रुग्णांचा मृत्यू झालाय. 


जेएन1. चे केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण


कोरोनाचा नवा सबव्हेरियंट जेएन.1 देशात हळूहळू हातपाय पसरतोय. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.  आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जेएन.1 सब व्हेरियंटचे 157 रुग्ण आहेत. या नव्या सबव्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमधील तब्बल 78 रुग्ण आहेत. तर गुजरातमध्ये 34 रुग्ण आहेत. गोवा Goa (18), कर्नाटक Karnataka 8, महाराष्ट्र Maharashtra 7, राजस्थान Rajasthan 5, तामिळनाणू 4, तेलंगणा Telangana 2 आणि दिल्लीमध्ये एक रुग्ण आहे.