July 2023 Full Moon : आजचा चंद्र हा त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसणार आहे. आजच्या पौर्णिमेच्या चंद्राचे रूप हे काहीसे वेगळे पाहायला मिळणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत चंद्राचे आकर्षण असते. आज आकाशात चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसणार आहे. आकाराने मोठ्या आणि आकर्षक दिसणाऱ्या चंद्राला बक मून (Buck Moon) किंवा सुपरमून म्हणले जाते. पृथ्वी आणि चंद्र यातील सरासरी अंतर हे 3,82,500 किमी असते मात्र आजच्या दिवशी ते 3,70,000 किमी असल्याने या अनोख्या बक मूनचे साक्षीदार अनेक लोकांना होता येणार आहे.


गुरुपौर्णिमेचा (Guru Paurnima) दिवस खगोलप्रेमींसाठी खूप खास असणार आहे. कारण आज ‘सुपरमून’ दिसणार आहे. आज सर्वांना मोठा आणि अधिक प्रकाशमान चंद्र पाहण्याची संधी मिळणार आहे. आज वर्षातील सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे असे मानले जात आहे. यंदा पुढील वर्षभरात 30 ऑगस्ट, 1ऑगस्ट आणि 29 सप्टेंबर रोजी ‘सूपरमून’ दिसणार आहे.


बर्‍याच वर्षांमध्ये 12 पौर्णिमा असतात, तर 2023 मध्ये अशा 13 चंद्र घटना घडतील. द ओल्ड फार्मर्स पंचांगानुसार, ऑगस्टमध्ये दोन सुपरमून दिसतील. त्यात 'ब्लू मूनचा' देखील समावेश असेल, जो या वर्षी पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. 2023 मधील शेवटचा सुपरमून 29 सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल.


2023 मध्ये या दिवशी पाहायला मिळेल पूर्ण चंद्र


● 1 ऑगस्ट: स्टर्जन मून


● 30 ऑगस्ट: ब्लू मून


● 29 सप्टेंबर: हार्वेस्ट मून


● 28 ऑक्टोबर: हंटर मून


● 27 नोव्हेंबर: बीव्हर मून


● 26 डिसेंबर: कोल्ड मून


या वर्षी अपेक्षित असलेल्या नऊ  उल्कावर्षावांपैकी काही भागात संध्याकाळपासून पहाटेपर्यंत सर्वाधिक उल्कावर्षाव या दरम्यान होतील


● दक्षिणी डेल्टा एक्वेरीड्स: जुलै 30-31


● अल्फा कॅप्रिकॉर्निड्स: जुलै 30-31


● पर्सीड : 12-13 ऑगस्ट


● ओरिऑनीड : ऑक्टोबर 20-21


● दक्षिणी टॉरीड : नोव्हेंबर 4-5


● नॉर्दर्न टॉरिड्स: नोव्हेंबर 11-12


● लिओनिड्स: नोव्हेंबर 17-18


●  जेमिनीड  :13-14 डिसेंबर


किती वाजता दिसणार वर्षातील सर्वात मोठा चंद्र?


आज चंद्रोदय 7.30 वाजता तर चंद्रास्त 5.07 मिनिटांनी होणार आहे. तुम्ही या कालावधीत वर्षातील सर्वात मोठा चंद्र सुपरमून पाहू शकता.


सूपरमून कसा पाहायचा?


सूपरमून तुम्ही उघड्या डोळ्यांनीही पाहू शकता. त्यासाठी चष्मा वगैरे घालण्याची गरज नाही. पण तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे चंद्रामधला बदल अनुभवायचा असेल, तर तुम्ही दुर्बिणीनेही पाहू शकता.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Buck Moon 2023 : काय आहे बक मून? वर्षातील सगळ्यात मोठ्या चंद्राचं दर्शन आज होणार