Sugar Price Hike: ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. साखरेची एमएसपी (MSP) अर्थात किमान बाजार मूल्य वाढवण्याची (Sugar Price Hike) दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारच्या ऊस गाळप हंगाम धोरण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारडे शिफारस केल्याची माहिती आहे. दरम्यान, सध्या सारखेचा दर 3100 रुपये प्रति क्विंटल आहे. तो 4100 रुपये करण्याची बैठकीत प्रमुख मागणी असल्याचे बोललं जात आहे. तर हा निर्णय झाल्यास याचा फायदा साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना होईल. या संदर्भात 20 ऑक्टोबरला राज्य सरकारचे केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयावर काय पाऊले उचली जातात आणि राज्यात लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Continues below advertisement

Sugar Production : भारताचा साखरेचा साठा वाढणार

भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 2025-26 या मार्केटिंग वर्षात (1 ऑक्टोबरपासून) उत्पादन 34.9 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढू शकते. नवीन हंगामात देशातील साखरेचा वापर 28.5 ते 29 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जो या वर्षी 28 दशलक्ष मेट्रिक टन होता. भारत नवीन विपणन वर्षाची सुरुवात 5 दशलक्ष मेट्रिक टनांच्या सुरुवातीच्या साठ्याने करेल, जो या वर्षाच्या सुरुवातीला 8 दशलक्ष मेट्रिक टन होता.

Sugar Price Hike : भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन

 देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे. त्यामुळं दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन होतं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून जगभरात भारताची ओळख आहे. भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन घेतलं जातं. आपली देशाची गरज भागवून देश मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात परदेशात करतो. दरम्यान, मागली वर्षी काही राज्यांमध्ये ऊसाचं क्षेत्र घटलं होतं. त्यामुळं ऊसाचा गळीत हंगाम देखील कमी दिवसाचा झाला होता. परिणामी उत्पादन देखील काही प्रमाणात कमी झालं होतं. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी झाल्या आहेत. त्यामुळं यावर्षी साखेरच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या: