Delhi UPSC Student Murder Case: उत्तर दिल्लीच्या तिमारपूर भागात झालेल्या रामकेश मीणाच्या (Ramkesh Meena) खळबळजनक हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यापैकी बी.एससी.फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी 21 वर्षीय अमृता चौहान आहे. युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तिच्या ओळखीच्या 32 वर्षीय रामकेश मीनाची हत्या करण्याचा कट अमृता रचला होता. अमृताने त्याचा गळा दाबला आणि नंतर रामकेश मीणा जाळून टाकले.

Continues below advertisement

6 ऑक्टोबरच्या रात्री तिमारपूरमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे जवान पोहोचले तेव्हा त्यांना राखेच्या ढिगाऱ्यात एक जळालेला मृतदेह आढळला. सुरुवातीला सर्वांना वाटले की हा अपघात आहे, परंतु फॉरेन्सिक तपासणीत वेगळाच प्रकार उघड झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मुखवटा घातलेले पुरुष आणि नंतर एक तरुण आणि एक महिला इमारतीतून बाहेर पडताना दिसले. यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला.

खोलीत तूप, तेल आणि वाइन ओतून आग लावली- (Delhi UPSC Student Murder Case)

अमृता चौहान फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी होती. अमृता चौहानने संदीप कुमार आणि सुमित कश्यपसोबत मिळून रामकेश मीणाची हत्या करण्याचा कट रचला होता. आरोपी सुमित कश्यप हा आधी अमृता चौहानचा प्रियकर होता. तर सुमित कश्यप गॅसच्या कंपनीत काम करत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 5 आणि 6 ऑक्टोबरच्या रात्री तिघांनी रामकेशचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी खोलीत तूप, तेल आणि वाइन ओतून आग लावली. गॅस सिलेंडर वितरक सुमितने सिलेंडर उघडा ठेवून एक स्फोट केला. ज्यामुळे सर्वकाही अपघातासारखे वाटेल. काही वेळातच, एका मोठ्या स्फोटाने संपूर्ण खोली व्यापली आणि रामकेशचा मृतदेह ओळखण्यापलीकडे गेला.

Continues below advertisement

हार्ड डिस्क, ट्रॉली बॅग आणि मृतकाचा शर्ट जप्त- (UPSC Student Murder Case)

मृताच्या कुटुंबीयांनी घटनेला संशयास्पद घोषित केले तेव्हा पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले. यामुळे अमृता चौहानचा शोध लागला, जिचे मोबाईल फोन लोकेशन घटनेच्या रात्री त्याच परिसरात होते. पोलिसांनी हार्ड डिस्क, ट्रॉली बॅग आणि मृतकाचा शर्ट जप्त केला. गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले. पोलीस आता तिन्ही आरोपींची चौकशी करत आहेत आणि अधिक तपास करत आहेत, या कटात आणखी कोणी सहभागी होते का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेमकं काय घडलं? (Delhi UPSC Student Murder Case)

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, अमृताने गुन्ह्याची कबुली दिली आणि घटनाक्रम सविस्तर सांगितला. अमृता चौहान म्हणाली की, मे 2025 पासून तिचे मृत रामकेश मीणासोबत संमतीने संबंध होते. रामकेशला अश्लील फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले असता, त्याने नकार दिला. यानंतर अमृताने हा सगळा प्रकार माजी प्रियकर सुमित कश्यपला सांगितला. सुमितने त्याचा मित्र संदीप याला या हत्येत सामील केले. 5-6 ऑक्टोबरच्या रात्री तिघांनीही रामकेशचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी खोलीत तूप, तेल आणि वाइन ओतून आग लावली. गॅस सिलेंडर वितरक सुमितने सिलेंडर उघडा ठेवून एक स्फोट केला.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Delhi UPSC Student Murder Case: फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थिनीचा एक्स बॉयफ्रेंड सिलेंडरवाला; नव्या प्रियकराला फ्लॅटमध्ये जिवंत जाळलं, लव्हस्टोरीचा भयानक शेवट