S.S. Rajamouli : आरआरआर (RRR) चित्रपटाची जादू थांबण्याचं नावंच घेत नाहीये. जगभरातून RRR चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे. RRR हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाच्या कथेने सगळ्यांच्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. RRR चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली (S.S. Rajamouli) यांना नुकतंच गोल्डन ग्लोब पुरस्काने सन्मानित करण्यात आलं. तसेच, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मिळून RRR हा यशस्वी चित्रपट बनवला आहे. आता खुद्द अमेरिकन सिने-दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग (Steven Spielberg) यांनीही 'आरआरआर' चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 


आरआरआर चित्रपटाचं देशातच नाही तर परदेशातही कौतुक होत आहे. परदेशातही प्रेक्षक हा चित्रपट मोठ्या संख्येने पाहात आहेत. राजामौली चित्रपटाच्या यशाबद्दल अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. तिथेही त्यांच्या चित्रपट आणि दिग्दर्शनाच्या कलेबद्दल त्यांचं कौतुक केलं जात आहे. अलीकडेच, Jaws, शिंडलर्स लिस्ट आणि ज्युरासिक पार्क सारखे चित्रपट बनवणारे अमेरिकन दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांनी राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाचं कौतुक केलं आहे.


यूट्यूबवर त्यांच्या फेबलमॅन चित्रपटाबद्दल बोलताना, दिग्दर्शक स्पीलबर्ग यांनी आरआरआरचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, “तुमचा चित्रपट अप्रतिम आहे. आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी हा चित्रपट पाहिला नव्हता. पण, गेल्या आठवड्यात मी तो पाहिला. आणि मला तो खूप आवडला. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. इतकी छान हा चित्रपट आहे. तुम्ही ज्याप्रमाणे अ‍ॅलिसन डूडीची कथा सांगितली हे मला फार आवडलं. तुमच्या चित्रपटातील दृश्यही फार सुंदर होती." 


पाहा व्हिडीओ : 



स्टीव्हन स्पीलबर्गकडून स्तुती ऐकल्यानंतर दिग्दर्शक राजामौली म्हणाले, "मला खुर्चीवरून उठून डान्स करावासा वाटतोय." या संवादानंतर त्यांच्यात फेबलमेन चित्रपटाच्या गप्पा रंगल्या. स्टीवन स्पीलबर्ग यांचे चित्रपट नेहमीच लोकांना आवडतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. स्पीलबर्ग यांचे हॉलिवूड तसेच भारतातही चाहते आहेत. स्पीलबर्ग यांचं हॉलिवूड चित्रपटसृष्टीत फार मोठं नाव आहे. त्यांच्याकडून आरआरआरची स्तुती ऐकणं ही केवळ राजामौलीसाठीच नाही तर भारतासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


SS Rajamouli : 'गोल्डन ग्लोब पुरस्कारा'नंतर एसएस राजामौली Steven Spielberg च्या भेटीला; फोटो शेअर करत म्हणाले,"देवाची भेट झाली"