सोलापूर: सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबा गावात एका दुकानदाराला चौघांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  इस्त्री करायला आलेल्या चार जणांना दुकानदाराने आपली थकीत उधारी मागितल्यानं या चौघांनी दुकानदाराला लोखंडी गजाने मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान याप्रकरणी कृष्णा सोनटक्के यांनी पोलिसांत या चौघांविरोधात तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल करुन यांना अटक केल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.


करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबा येथे कपडे इस्त्री करून घेण्याच्या कारणावरून एकाला चौघांनी मारहाण केली असल्याचा प्रकार घडला होता. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू करून चौघांवर त्याच दिवशी म्हणजे सोमवारी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली . मारहाण झालेले कृष्णा महादेव सोनटके यांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे. 


त्यावरून अमोल रामा गुंड, समाधान बिभीषण गुंड, साहेबराव चांगदेव व नवनाथ रामा गुंड (सर्व रा. शेटफळ नागोबाचे ) या चौघा आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.  यातील मुख्य आरोपीला सोमवार पासून आजपर्यंत पोलीस कोठडी दिली असून इतर तीन  आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे . यातील मारहाण झालेले  कृष्णा सोनटक्के यांचे गावात पंक्चर काढायचे आणि इस्त्रीचे दुकान आहे. सोमवारी म्हणजे 26 डिसेंबर रोजी कृष्णा याने आपल्या दुकानातील उदारी गुंड याना मागितल्यावर कृष्णा याला  चार जणांनी लोखंडी गजाने मारहाण केली होती . या मारहाणीत जखमी झालेल्या कृष्णा याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . येथे कृष्णा याने दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसात या चार आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक गुंजवटी यांनी सांगितले. 


पुण्यात कोयता दाखवत तरुणांची दहशत सुरूच 


पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत मजावल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.  दोन तरुणांनी हातात चाकू सूरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या हातातील शस्त्रांनी भोसकले. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखविली जात असून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात एक जण जखमी देखील झाला