सोलापूर : चारित्र्य पडताळणीसंबंधी बनावट प्रमाणपत्र (Fake character verification certificate) देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.  पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात येणारे चारित्र्य प्रमाणपत्र हा व्यक्ती बनावट पद्धतीने तयार करायचा आणि संबंधितांना द्यायचा. विशाल भारत येलगुंडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.


पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयाकडे (Solapur Police) पाकणी ता.उ.सोलापूर येथील एक इसम बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देत असल्याची माहिती प्राप्त होती. बनावट प्रमाणपत्र देण्याच्या इसमाचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यावरून पोनि सुरेश निंबाळकर, स्वा.गु.शा. सालापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शैलेश खेडकर यांनी सदर बातमीचा पडताळणी केली असता पाकणी येथील एक इसम पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या चारित्र्य  पडताळणी प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून आणि त्यावरील डिजिटल सिग्नेचरच्या चिन्हाचा फसवणुकीकरता गैरवापर करून बनावट प्रमाणपत्र देत असल्याचे निष्पन्न झाले.


त्यावरून सदर इसमाविरूद्ध पोहेको चंद्रकांत बाबूराव पवार यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि.क. 420, 464,465, 468, 471 माहिती तंत्रज्ञान अधिनिमय 2005 चे कलम 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर इसमास अटक केलेली असून त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे.


याद्वारे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाकडून बिलंब टाळणारी व कमी खर्चात प्रमाणपत्र देणारी ऑनलाईन कार्यपध्दती अवलंबविण्यात येत असून नागरिकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा बनावट कागदपत्रे तयार करणे, ते बाळगणे आणि बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे हा गंभीर दखलपात्र अपराध आहे. अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्र देण्याचे कोणी आमिष दाखवत असेल अथवा प्रमाणपत्र देणाबाबत माहिती असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा.


सदरची कामगिरी ही मा. शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्वा.गु. शा. सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्त्वाखाली सपोनि शिवाजी जायपत्रे, पांगरी पोलीस ठाणे पासई शैलेश खेडकर, सहा फौ. निलकंठ जाधवर, पोह हरीदास पांढरे, कांत पवार, आबासाहेब मुंढे, पोलीस अंमलदार विलास लोखंडे व काकडे यांनी पार पाडली आहे.


सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे संबंधीत पोलीस ठाणे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील जिल्हा विशेष शाखेकडून देण्यात येते. सदरचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र पोलीसांच्या pcs.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते. सदरची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शी कमी खर्चाची आणि विलंब टाळणारी आहे.


ही बातमी वाचा: