सोलापूर:  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP)  बंड केलं. त्यांच्यासोबत 44 आमदार आले आणि अजितदादा गटाने सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे अजितदादा गटात  मोठी इनकमिंग होईल  सुरू आहे. सोलापुरातील (Solapur News) दोन मोठे नेते अजित पवार गटाच्या गळाला लगला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar)  गटाला हा मोठा फटका आहे. सोलापुरातील तीन  माजी नगरसेवकानी आपल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. 


सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी गटनेते तौफिक शेख, माजी नगरसेवक गणेश पुजारी यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झालाय. या सर्वानी नुकतीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतं प्रवेशासंदर्भात चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली. आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांनी 2019 च्या पालिका निवडणुकीत बसपाकडून निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. तर तौफिक शेख यांनी एमआयएमकडून पालिका निवडणूक लढवलेली होती.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का


आनंद चंदनशिवे आणि तौफिक शेख यांना मानणारा वर्ग मोठा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा या दोघांनी सांभाळली होती. मात्र लोकसभेतल्या पराभवनंतर या दोघांनी ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सर्वानी आता अजित पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का समजला जातोय. दरम्यान या महिनाअखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येणाची शक्यता आहे. त्यांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. 


शरद पवार दोन दिवस जिल्ह्यात...


एकीकडे महायुती जोरदार तयारी करत असताना महाविकास आघाडी देखील सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघांकडे लक्ष केंद्रित करत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 19 आणि 20 जानेवारी रोजी शरद पवार सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार हे दोघे एकत्रित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.  


हे ही वाचा :


देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा, शरद पवारांचा टोला