मुंबई : राममंदिराच्या (Ram Mandir)  कामाचा निर्णय राजीव गांधी (Rajiv Gandhi)  यांच्या काळात झाला. आता भाजप (BJP)  आरएसएस (RSS)  त्याचा मतांसाठी फायदा घेत आहेत अशी टीका शरद पवार यांनी केलीय. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का असा सवाल शरद पवारांनी (Sharad Pawar)  केला. देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा असा टोला पवारांनी लगावला. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील उत्तम पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 

Continues below advertisement

धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अयोध्येचा श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. अयोध्येतील मशीद पडल्यानंतर इथं राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला आहे. राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला. राम मंदिराचे काम  बाजूला राहिले मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतासाठी फायदा करून घेत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केला आहे.  

देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी  मोदींनी उपवास करावा : शरद पवार (Sharad Pawar On Ram Mandir) 

 राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? असा सवाल शरद पवारांनी भाजपला केला आहे.   मोदी  राम मंदिरासाठी 10 दिवस उपवास करत आहेत तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा, असा सल्ला देखील शरद पवारांनी मोदींना दिला आहे. 

Continues below advertisement

सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही : शरद पवार (Sharad Pawar On Farmer) 

 मी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतंपण आज देखील शेतकरी कर्जात आहे. या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. या देशात उद्योगपतीची कर्ज माफ होतात पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणं करणाऱ्या लोकांना बाजूला केलं पाहिजे. कर्नाटक राज्यातील निकाल विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जातोय, असे देखील शरद पवार म्हणाले.  

हे ही वाचा :