सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अशात सोलापूर (Solapur) जिल्ह्यात पुढील चार दिवस राजकीय वातावरण भर थंडीत तापणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 19 तारखेला सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून (BJP) जोरदार तयारी सुरु आहे. 14 तारखेला महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने नुकतेच आपली मोठ बांधली आहे. आता मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनच्या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवस सोलापुरात मुक्कामी असणार आहेत. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे उद्या 17 जानेवारी रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. सोबतच, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने येणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अक्कलकोटमध्ये देखील सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अक्कलकोटमध्ये ही सभा होणार आहे. याच काळात शरद पवार (Sharad Pawar) देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. 


27 डिसेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापुरात होते. यावेळी त्यांनी बूथ वॉरियर्सची बैठक घेतली होती. आता अवघ्या 15 दिवसातच बावनकुळे हे दुसऱ्यांदा सोलापुरात येणार आहेत. आता 14 जानेवारी रोजी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापुरात होते. यावेळी महायुतीचा मेळावा देखील चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित पार पडला होता. आता पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने 17 जानेवारी ते 19 जानेवारी असे तीन दिवस चंद्रकांत पाटील सोलापुरात मुक्कामी असतील.


शरद पवार दोन दिवस जिल्ह्यात...


एकीकडे महायुती जोरदार तयारी करत असताना महाविकास आघाडी देखील सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघांकडे लक्ष केंद्रित करत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 19 आणि 20 जानेवारी रोजी शरद पवार सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार हे दोघे एकत्रित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. 


महाविकास आघाडी लागली कामाला...


19 तारखेला एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर असताना, त्याच दिवशी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सांगोला येथे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मरणात आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मंगळवेढा येथे देखील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हजेरी लावणार आहेत. तर, दुसऱ्या दिवशी 20 तारखेला सोलापुरातील माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचा सत्कार सोहळा शरद पवार-सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याला देखील शरद पवार उपस्थित राहणार आहेत. राजकीय नेत्यांच्या या कार्यक्रमामुळे सोलापूरचे पुढील चार दिवसातील वातावरण तापणार आहे.


सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची हजेरी...



  • 17 जानेवारी
    चंद्रशेखर बावनकुळे

  • 17 ते 19 जानेवारी
    चंद्रकांत पाटील

  • 19 जानेवारी
    पंतप्रधान नरेंद्र मोदी
    एकनाथ शिंदे
    देवेंद्र फडणवीस
    अजित पवार

  • 19 आणि 20 जानेवारी
    शरद पवार
    सुशीलकुमार शिंदे


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sharad Pawar : एकाच दिवशी देशाचे दोन मोठे नेते सोलापुरात, 19 जानेवारीला शरद पवारही दौऱ्यावर