बार्शी: बार्शी तालुक्यामध्ये मानलेल्या बहिणीवरती भावासह तिच्या प्रियकराने अत्याचार (Pune Crime News) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मानलेल्या भावाने व प्रियकराने मिळून 34 वर्षीय विवाहित महिलेला कारमधून कुडूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तेथे तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.(Pune Crime News)
सुरेश परसु माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पिडीत 34 वर्षीय पिडितेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.(Pune Crime News)
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा नवरा पुण्यामध्ये सेंट्रींग काम करतो, तर पिडित विवाहित महिला तीन महिन्यांपासून आपल्या मुलीसोबत बार्शीमध्ये राहते. सुरेश परसु माळी याच्यासोबत संबंधित पिडितेचे सुमारे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानवसे हा विवाहीतेला बहीण मानत होता. सुरेश माळी व संतोष भानवसे हे दोघे सप्टेंबर महिन्यात पुण्यातून पीडितेला बार्शीकडे (Pune Crime News) न्यायला आले. त्यास पीडितेने नकार देताच सुरेशने तिला मारहाण केली होती.
त्यानंतर पिडित विवाहित महिला बार्शीत आल्यावर संतोषने सांगितले की, तू माझी बहीण आहेस. तुझं सुरेश (विवाहितेचा प्रियकर) एकतो. त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमवून दे. तेव्हा सुरेशशी बोलून त्याच्या मुलीचे संतोषच्या मुलाशी लग्न जुळवून दिले. दि. 22 डिसेंबर 2024 रोजी पिडिता लग्नाला आली होती. लग्न झाल्यानंतर पीडितेचा पती जास्त दारूच्या नशेत असल्याने त्याला सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी वऱ्हाडाच्या गाडीत पाठवून दिले.
त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास या दोघांनी मिळून पिडितेस चल तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो असे म्हणून सुरेश माळी याने त्याच्या स्वीफ्ट गाडीमध्ये बसवून कुर्डूवाडी रोडवरील लॉजवर नेलं. तिथे सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला. तसेच तू गावात राहायचे नाही. तू पुण्यात जाऊन राहायचे. जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने करत आहेत.