Solapur Crime: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून गोवंशाचे जतन संवर्धन करण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या गोशाळेतील एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे . या गोशाळेतील मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी वासरू दूध पित नाही म्हणून त्याला आपल्या मांडीत दाबून अन् मान धरून भांड्यात तोंड घातले. जबरदस्तीने दूध पाजल्याने काही वेळातच आईसमोरच त्या वासराने प्राण सोडल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
ही घटना 23 एप्रिल रोजी घडल्याची माहिती समोर आली असून, अद्याप मंदिर प्रशासनाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, राज्यात सध्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकार असून, गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. अशा परिस्थितीत मंदिर समितीच्या अधिपत्याखालील गोशाळेतच असा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतून गाईच्या वासराला जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न करताना त्याचा मृत्यू झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी वासराला जबरदस्तीने एका भांड्यात दूध पाजण्याचा प्रयत्न केला. वासरू दूध पित नसल्याने त्याला जमिनीवर दाबून, मांडीत पकडून, मान धरून जबरदस्तीने भांड्यात तोंड घालण्यात आले. काही वेळातच वासराने आपल्या आईसमोरच प्राण सोडला, हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रीया येत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही होतेय.
काठीने चोप ते लघुशंका पाजणं; बूट तोंडात धरायला लावायचा अन्...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या शिऊर गावातून एक थरारक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथे एक बाबा अघोरी पद्धतीने सामान्यांच्या वर उपचार करत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि एबीपी माझा त्याचा फांडाफोड केला. मुल होत नाही, लग्न होत नाही, दारू सोडत नाही, अंगात भूतबाधा झाली आहे, अशा नागरीकांना मग ती महिला असो वा पुरुष तो त्याना काठीने मारायचा. स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा आणि मंदिराला गोल चकरा मारायला लावायचा. झाडाची पानं खायला द्यायचा. एवढेच नव्हे तर लघु शंका करून तो पिण्यासही देत असे. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा